रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्या करता बुधवारी कँडल मार्च

 रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्या करता बुधवारी  कँडल मार्च 

वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यंकची ३० नोहेंबर रोजी जातेगाव घाटात हत्या झाली या घटनेला २५ दिवस उलटले मात्र या घटनेचा मुख्य सूत्रधार बाळ बोथे हा पोलिसांना अजूनही सापडत नाही. त्याला तातडीनं जेरबंद करून रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर यांच्या कुटुंबियांच्या वतीने बुधवारी दि. ३० रोजी सायंकाळी ५.३० भिंगारवाला चौक ते छत्रपति शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर कँडल मार्च काढण्यात येणार आहे. 

३० नोव्हेंबर ला रेखा जरे  यांची हत्या झाल्यानंतर  १ डिसेंबर च्या रात्री बाळ बोटे हा नजरेआड झाला तर शहरातील राजकीय, सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच महिला संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या संदर्भात मौन बाळगणेच पसंत केले आहे. म्हणून या प्रकरणाला वाचाफोडण्यासाठी जर कुटुंबीयांनीच पुढाकार घेऊन जिल्ह्यातील जास्तीत नागरिकांनी यात सहभागी होऊन स्व. रेखा जरे  यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन  केले आहे.    

Post a Comment

0 Comments