आरोग्य आहार : रिबन राईस

आरोग्य आहार 

 रिबन राईस

साहित्य : १ किलो तांदळाचा फडफडीत शिजवलेला भात, अर्धी वाटी टोमॅटो सॉस, २ वाट्या मटार, १ वाटी चिरलेले बीन्स , २ वाटी किसलेले गाजर, ५० ग्रॅ किसलेले चीज, मिरपूड अर्धा चमचा ,मीठ चवीनुसार. 

हिरव्या मसाल्याचे साहित्य : १ गड्डी चिरलेली कोथिंबीर ,२-३ हिरव्या मिरच्या,५-६ लासून पाकळ्या, मूठभर पुदिना पाने , मीठ घालून पाणी न घालता वाटून घेणे.        

कृती : शिजवलेल्या भाताचे ३ समान भाग करून घ्यावे , एका भागाला हिरवा मसाला हलक्या हाताने लावून घेणे.दुसऱ्या भागाला अर्धी वाटी टोमटो सॉस लावून घेणे व  भागाला चीज लावून घेणे. 

२ वाट्या मटार, व चिरलेले बीन्स  चिमूटभर सोडा घालून वेगवेगळे उकडून घ्यावेत. 

जाड बुडाच्या  भांड्यात १ टे स्पून तूप घालावे त्यावर हिरवा मसाला लावलेला भात त्यावर निम्मे मटार व बीन्स पसरवून त्यावर टोमॅटो सॉस लावलेला भात त्यावर किसलेले गाजर व त्यावर निम्मा चीज लावलेला भात असे थर लावावेत १ टे स्पून सोडावे. भाताचे तव्यावर ठेऊन झाकण ठेवून भाताला दणदणीत वाफ आणावी. 

टीप :

*  वाढतांना भात वाढणी किंवा झारा उभा पातेलाट घालून खालपासून भट काढावा म्हणजे भाताचे तिन्ही थर एकावर एक छान दिसतील. 

* रंगसंगीती ला साजेश्या आवडीच्या इतर भाज्या देखील घालू शकता. 

* टोमॅटो सॉस ने मनासारखा रंग येत नसल्यास सॉस मधेंचय थोडासा खाण्याचा रंग घालून कालवावे.  

Post a Comment

0 Comments