बाळ बोठे अद्याप नजरेआड

 बाळ बोठे अद्याप नजरेआड 

वेब टीम नगर : जरे हत्या कांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठे याचा पोलीस यंत्रणा शोध घेण्याचा कसून प्रयत्न करत असून काही दिवसांपूर्वीच बाळ बोठे  याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची तपासी अधिकारी उपाधीक्षक अजित पाटील यांनी चौकशी केली. तर काहींचे जवाबहि नोंदवल्याची माहिती समजते. तसेच पोलिसांनी नागरिकांना काही माहिती असल्यास  कळविण्याचे आव्हान केले होते. त्यात मिळून आलेल्या माहितीतुन काही धागे दोरे मिळतात का याचीही चाचपणी पोलीस यंत्रणा करत आहे. 

३० नोव्हेंबर ला जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जारे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती घटने नंतर पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या जबाबा वरून व अन्य तांत्रिक पुराव्यानुसार बाळ बोठें हाच या घटनेतील प्रमुख सूत्रधार असल्याचे पुढे आले. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच बाळ बोठे हा नजरेआड झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

दरम्यान पोलिसांनी त्याला फरार घोषित करावयासाठी अनेक व्यक्तींनी मागणी केली असून त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. 

Post a Comment

0 Comments