लॉरेन्स स्वामी विरोधात मोक्का प्रस्ताव पाठवीला
वेब टीम नगर – दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या स्वामी लॉरेन्स यांच्या सह ७ जणांच्या विरोधात मोका अंतर्गत प्रस्थाव पाठविला असल्याने , लॉरेस स्वामीं यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
भिंगार पोलीस ठाण्यामध्ये दरोडा या गुन्ह्यात आरोपी असलेल्या लॉरेन्स स्वामी यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाआठ तास ताटकळत ठेवलेल्या लॉरेन्स स्वामीला पोलिसांनी सरतेशेवटी अटक केली . पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्यानंतर लॉरेन्स स्वामीच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला .
पोलिसांनी लोरेन्स स्वामी यांच्या सह प्रकाश भिंगारदिवे, संदीप शिंदे. विक्रम गायकवाड. बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव. संदीप वाकचौरे, अर्जुन सुर्वे, बाळासाहेब भिंगारदिवे, यांच्यासह या जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई साठीचा प्रस्थाव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, या सात जणांवर भिंगार पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी १० ते १२ जागी गुन्हे दाखल आहे.
0 Comments