मुंबईत अडीच कोटीचे अमलीपदार्थ जप्त


मुंबईत अडीच कोटीचे अमलीपदार्थ  जप्त



 वेब टीम मुंबई :  अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केलेल्या  एनसीबीच्या पथकाने एका मोठ्या  ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.  ड्रग सप्लायर आणि तस्कर रेगल महाकाल याला अटक केली आहे. रेगल हा बऱ्याच महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. रेगल हा अनुज केशवानी नावाच्या आरोपीला ड्रग पुरवत होता आणि अनुज दुसऱ्यांना  ते पुरवायचा, अशी माहिती समोर आली आहे

एनसीबीने बुधवारी दोन ड्रग सप्लायरना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो मलाना क्रीम जप्त करण्यात आलं  आहे. त्याची किंमत २.५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ लाखांची रोकडही जप्त केली आहे.

Post a Comment

0 Comments