बोठेच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी

 बोठेच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी 

वेब टीम नगर : जरे  हत्याकांडातील  मुख्य सूत्रधार बाळ बोठेने ॲड.महेश तवले यांच्या मार्फत अटकपूर्व जमीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज (मंगळवारी) दुपारी सुनावणी झाली यात जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी तपासी अधिकाऱ्यांना तसेच सरकारी वकिलांना  त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितले असून दि.११ डिसेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.  

जरे हत्या कांडात आपले नाव निष्पन्न होणार याची कुणकुण लागताच बाळ बोटे त्याच रात्री आपले दोन्ही मोबाईल घरीच ठेऊन पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्यानंतर पोलिसांची ५ पथके बोठे चा शोध घेत आहेत. कालच त्याने नाशिक मध्ये सुद्धा पोलिसांना हुलकावणी दिल्याची बातमी आहे. त्यानंतर सायंकाळी ॲड.महेश तवले यांनी त्याचा जामीन अर्ज दाखल केल्याची मागणी केली, याच जमीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली त्यात वरील निर्णय घेण्यात आला. 

एकूणच तपासी पोलीस अधिकाऱ्याचे आणि सरकारी वकिलाचे म्हणणे न्यायाधीशांनी मागविल्याने बाळ बोठे समोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. 

Post a Comment

0 Comments