जरे हत्या कांडातील प्रात्यक्षदर्शी साक्षीदाराने जबाब नोंदवला

 जरे हत्या कांडातील प्रात्यक्षदर्शी साक्षीदाराने जबाब नोंदवला 

वेब टीम नगर : रेखा हत्या कांड प्रकरणात  घटना घडली त्या  वेळच्या प्रत्यक्ष दर्शी साक्षिदार महिला व बाल विकास कल्याण अधिकारी विजयमाला माने यांचा   जबाब आज नोंदवल्याची माहिती विजयमाला एका वृत्त वहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेवरून समजली.  . 


रेखा जरे , विजयमाला माने , आणि जरे यांचे कुटुंबीय पुण्याहून अगरकडे येत असतांना जातेगाव घाटात दुचाकी स्वरांनी गाडी आडवी घालून जरे यांच्यावर हल्ला केला. हि घटना विजयमाला माने यांनीच फोन करून बाळ बोठेला सांगितल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच या प्रवास दरम्यान बाळ बोठे व माने यांच्यात मेसेजिंग झाल्याचे समजते. 


विजयमाला माने या नगर मध्ये महिला व बाल विकास विभागात कार्यरत असून त्या बाळ बोठेच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतात. बाळ बोठे याने माने यांना बहीण मानल्याचे  सांगितले जाते. दरम्यान विजयमाला माने या घटना घडल्याच्या दिवशीच रात्री उशिरा पासून पसार झाल्याचे सांगितले जात होते मात्र प्रकृती अस्वास्थ्या मुळे त्या त्यांच्या मूळ गावी गेल्याचे सांगण्यात आले.  मात्र आज पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्याची माहिती पुढे येत आहे. 


Post a Comment

0 Comments