रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

 रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड 

वेब टीम मुंबई : जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी काळ रात्री १.३० वाजता मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. झुपकेदार मिश्या, भारदस्त आवाजाच्या जोरावर त्यांनी चित्रपट, नाटक, आणि चित्रमालिका ह्यांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. मृत्यू समयी त्यांचं वय ८४ वर्षाचं होत. 

वयाच्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाटट्यमोत्सवाचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

मराठी चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकारी , पाटील या भूमिका प्रामुख्यानं निभावल्या. त्यांची अनेक नाटकं गाजली विशेषतः अररण्यक या नाटकातील त्यांची धृतराष्ट्राची भूमिका पल्लेदार संवादामुळे गाजली तर जनता राजा मधील औरंगजेबाची भूमिका हि त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय भूमिका ठरली. ह्या व्यतिरिक्त , छोट्या पडद्या वरील अनेक चित्रमालीकांमध्येही त्यांनी काम भूमिका केल्या . अग्ग बाई सासूबाई य मालिकेतील त्यांची आजोबांची भूमिका चांगलीच ठसा उमटवून गेली. 

कुटुंबात आणि मित्र परिवारात ते अण्णा या नावाने सर्वज्ञात होते. तर शिस्तीचा अभिनेता म्हणून त्यांचा लौकिक होता.   

Post a Comment

0 Comments