जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे अद्याप फरार

 जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे अद्याप फरार 

वेब टीम नगर : रेखा जरे हत्येला ५ दिवस उलटले असून या घटनेचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे.मात्र या हत्या प्रकरणातील उर्वरित ५ आरोपी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर या पाचही जणांना ७ तर्कघेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे . मात्र मुख्य आरोपी बाळ बोठे  हा घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला असून त्याच्या मागावर असलेली पोलिसांची पाच पथके बाळ बोठे याचा शोध घेत आहेत. 

३० तारखेला रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर जरे यांचा मृत देह सिव्हिल मध्ये आणण्यापासून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करून झाल्यानंतर अमरधाम येथे मृतदेहावर नाट्यसंस्कार होई पर्यंत प्रत्येक ठिकाणी हजेरी लावत पोलिसांची गुन्हेगारांना पकडण्यासाठी काय हालचाली करत आहेत.याचा कानोसा घेत पोलीस यंत्रणेला अखेरच्या क्षणी तुरी देऊन स्वतःचे दोन्ही मोबाईल व सर्व वाहने घरीच ठेऊन पसार झाला. खरं तर इथेच पोलीस यंत्रणेला गाफील ठेवण्यात बाळ बोठे यशस्वी झाला. वाहने घराच्या पार्किंग मध्येच आणि मोबाईलचे लोकेशन घरचेच येत असल्याने पोलीस यंत्रणेला चकवा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला. 

पोलिसांची ५ पथके बाळ बोठे याच्या तपासाच्या दृष्टीने त्याच्या मागावर आहेत.लवकरच तपासाला यश येईल.असे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments