आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

मिक्स ग्रेन अँड व्हेजी स्टीम रोल 

साहित्य :  नाचणी , मका, ज्वारी, बाजरी, सोया बिन, गहू, चणा डाळ पीठ प्रत्येही पाववाटी. पालक , कोबी, मेथी, गाजर, दुधी , बिट ,सिमला, बीन्स , वाटाणा व स्वीट कॉर्न भरड प्रत्येकी ४ ते ५ चमचे . आले लसूण मिरची पेस्ट, अर्धी वाटी दही, मीठ , कोथिंबीर , ओला नारळ. 

कृती : सर्व पीठे व सर्व भाज्या आलेलसूण हिरवी मिरचीपेस्ट, दही, मीठ, कोथिंबीर , सर्व एकत्र करून मळून घेणे . त्यानंतर त्याचे गोळे करून मोदक पात्रात वाफवून घेणे. वाफवून झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करून थोड्या तेलाची फोडणी करून परतून घेणे. ओल्या नारळाचा चव घालून चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करणे. 

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak   


Post a Comment

0 Comments