आरोग्य आहार : कणकेचे चिरोटे

 आरोग्य आहार 

कणकेचे चिरोटे 

साहित्य : ३ वाटी कणिक , साजूक तूप , ओवा , मीठ ,पिठीसाखर, कॉर्नफ्लॉअर.

कृती : प्रथम ३ वाटी कणिक घेऊन, त्यामध्ये चिमूट भर ओवा , चिमूटभर मीठ व २ डाव साजूक तुपाचे मोहन (गरम) घालून कणिक घट्ट मळून घ्यावी. त्यानंतर कणकेचे छोटे छोटे ३ गोळे करावेत . तिन्ही गोळ्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात .प्रथम पोळपाटावर एक पोळी घेऊन त्यावर साजूक तूप लावून घ्यावे. त्यावर  कॉर्नफ्लॉअर पसरून घ्यावे. त्यावर दुसरी पोळी ठेऊन पुन्हा त्यावर तूप व कॉर्नफ्लॉअर लावून तिसरी पोळी ठेवावी. तिन्ही पोळ्यांचा एकत्र रोल करून घेणे. 

तयार रोलचे छोटे तुकडे करून घ्यावे व लांबट पुऱ्या लाटून घ्यावात.तयार पुऱ्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात. तळून झाल्यावर जरं असतांनाच त्यावर पिठीसाखर भुरभुरावी . 

कणकेत असलेल्या मीठ , ओवा आणि वरून लावलेल्या पिठीसाखरेमुळे चिरोटे अत्यंत चविष्ट होतात.        

टीप : वेगवेगळ्या रंगात कणिक मळल्यास सुंदर रंगीत व आकर्षक चिरोटे करता येतात. 

Post a Comment

0 Comments