रेखा जरे हत्येचा तपास सीबीआयकडे द्या समाजवादी पार्टीची मागणी

रेखा जरे  हत्येचा तपास सीबीआयकडे द्या 

समाजवादी पार्टीची मागणी

वेब टीम नगर : महिला सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्येने संपुर्ण जिल्हा हादरला असताना या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवून यामधील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले.

सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांचा दि. ३०नोहेंबरला रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा जवळील जातेगाव घाटात प्रिप्लॉन पद्धतीने अमानुषतेने धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यांची झालेली अमानुष हत्या ही संपुर्ण महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आनणारी आहे. या हत्येमागे मोठया धनदांडग्याचा हात असेल अशी सध्या चर्चा नगरकरांमध्ये आहे. सदर प्रकरण उघडकीस आल्यास यामध्ये अनेक मोठ्या नामवंत व्यक्तींचा पर्दाफाश होणार आहे. या परिस्थितीमध्ये गुन्ह्यातील आरोपी सापडले असले तरी यामागील प्रमुख म्होरक्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. सदरील गुन्ह्याचा तपास निपक्षपातीपणे होण्यासाठी या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. खरा आरोपी जनतेसमोर आनून त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


Post a Comment

0 Comments