बिबट्या आलारे ......

बिबट्या आलारे ......             

                        


वेब टीम नगर : गेल्या आठवड्यात चांदबिबीचा महाल परिसरात एक दोन नव्हे तर तब्बल चार मिनिटे दिसले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कापूरवाडी परिसरात बिबट्याने एका गाईवर हल्ला केल्याची बातमी आली त्यानंतर पाथर्डी तिसगाव व अजूनही तशाच बातम्या आल्या नाही बिबट्याची दहशत वाढली आहे बातम्या यायला लागल्या गर्भगिरी डोंगरात बिबट्यांचा वावर वाढला आणि ग्रामस्थांचा बंद पिंजरा लावण्याच्या मागणीही जोर धरू लागल्या रोज कुठून ना कुठून पिंजऱ्याची मागणी होऊ लागली.

चांदबिबीचा परिसरात बिबट्याचा वावराचा व्हिडिओ व्हायरल होतात खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाच वाजेपासून सकाळी उजाडेपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी बंद केला जागोजागी सावधानतेचे फलक लावण्यात आले या परिसरात बिबट्या आणि तरस हे दोन्ही प्राणी आढळतात त्यामुळे या परिसरात फिरताना विशेष सावधगिरी बाळगावी.

सध्या पाथर्डी, तिसगाव, मढी, डोणगाव या गावात वनविभागाने पिंजरे लावले आहेत पण विभागाच्या गस्ती पथकाच्या गस्ती ही सुरू आहेत त्याचबरोबर वनविभागाच्यावतीने वाघ व बिबट्या आदिवासी क्षेत्रात वावरताना घ्यावयाच्या काळजीबाबत माहितीपत्रके सुद्धा वाटण्यात आली आहेत.मात्र पिंजरा लावणे हा उपाय नसल्याचे सांगतांना पिंजरे एकाठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी शासकीय तरतूद  नसल्याने पैसे नसतात.पिंजरे लावण्यासाठी वनविभागाच्या मुख्यालयातून परवानगी लआत असल्याने तेथून परवानगी आल्यावरच पिंजरे लावता येतात ,त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते.   

नगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र भरपूर असल्यामुळे बिबट्या वा तत्सम प्राण्यांना लपण्यास जागा मिळते त्यामुळे ते हल्ला करून ताबडतोब पसार होतात अनेकदा वनविभागाच्या लोकांना बिबट्या असल्याची माहिती दिली जाते मात्र वनखात्याची माणसं तिथे पोहोचेपर्यंत तेथे काहीच सापडत नाही तर अनेक वेळा तरच कुत्रे पाहूनही बिबट्या दिसल्याची आवई उठवली जाते त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताण येतो आपल्याकडे अकोले संगमनेर राहुरी मिळत पिंपळगाव माळवी आदी ठिकाणी बिबट्याचा वावर असून आता नव्याने गर्भगिरीच्या पर्वतरांगेत ही बिबट्यांचा वावर वाढला आहे.

वाघ व बिबट्या आदिवासी क्षेत्रात घ्यावयाची काळजी

वाघ व बिबट्याचे जीवशास्त्र

वाघ व बिबट्या मानवाला घाबरतो आणि साधारणपणे मानवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो

वाघ व बिबट्याला स्वतःचा प्रदेश परिचयाचा असतो

एखाद्या परिसरातून वाघ व बिबट्या पकडल्यास दुसरा तरुण वाघ किंवा बिबट्या त्यांची जागा घेऊ शकतो

अशी नवीन जागा त्या वाघाच्या परिचयाची नसल्याने संघर्ष वाढू शकतो

वाघ व बिबट्या प्रवण क्षेत्रात सावधगिरीने कसे वागावे

वाघ व बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका मागे फिरा आणि त्याचा कधीही पाठलाग करू नका ,खाली बसून कामे करणे टाळा ,अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नका, अंधारात एकटे फिरताना ,शौचाला जाताना, रात्री शेतात पाणी भरण्यात जाताना मोठ्याने गाणी म्हणा किंवा बरोबर मोबाईल मध्ये गाणे भरून मोठ्या आवाजात वाजवा, गळ्याभोवती मफलर गुंडाळा ,रात्री शेतात जाताना सोबत कंदील, बॅटरी, दणकट काठी ठेवा किंवा अंधारात जाताना आपल्या पाळीव कुत्रा सोबत घेऊन जा कुत्र्याच्या गळ्यात काटेरी पट्टा घाला सोबत शिट्टी ठेवा ठराविक अंतराने मोठ्याने वाजवा वाघ व बिबट्या ने केलेल्या शिकारी जवळ जाऊ नका तो लपून बसलेला असू शकतो पुरेसे खाद्य व राहण्यायोग्य वातावरण मिळाले तर वाघ व बिबट्या गावाजवळ राहू शकतो पाळीव जनावरे कुत्रे व डुकरे वाघ व विठ्ठला वस्तीकडे आकर्षित करतात स्वतःचे नुकसान कमी करण्यासाठी आपल्या गुरांना बंदिस्त गोठ्यात ठेवा रात्रीच्या वेळी गोठ्यात प्रखर उजेड लावा इतर वन्य प्राणी जसे रान डुक्कर ,हरणे ,जंगली ससे हे सुद्धा वाघ व बिबट्याचे खाद्य आहे त्यांचेशी कार्यापासून संरक्षण करा

गावाजवळ वाघ व बिबट्याचा वावर कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी

वाघ व बिबट्या गाव स्वच्छ ठेवल्यास कचरा मुळे येणाऱ्या मोकाट कुत्रे व डुकर यांची संख्या कमी होईल सापळे लावण्यापासून लोकांना परावृत्त करा कारण सापळ्यात अडकलेला वाघ व बिबट्या शिकार करू शकत नसल्याने जास्त धोकादायक बनू शकतो वाघ व बिबट्या दिसल्यास गावात दवंडी द्या त्या ठिकाणी जाणे टाळा.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी दिली. 

वन्यप्राण्यांना बाबत काही तक्रार असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा टोल फ्री क्रमांक १९२६ वनपरिक्षेत्र अधिकारी अहमदनगर ९८५०७५१८९९ मंडळ अधिकारी अहमदनगर ७२१९१३३२५७ वनरक्षक  ८३२९८७२२२५ वन परिमंडळ अधिकारी कवडगाव ९८३४९२०७३०  वनरक्षक  ९८३४६४०१७२ वन परिमंडळ अधिकारी जेऊर ९७६४२९२०२० वनरक्षक  ९३३७००२००७ वन परिमंडळ अधिकारी गुंडेगाव  ९८३४६३८५७४ वनरक्षक  ७०६६४२६८२६ वन परिमंडळ अधिकारी नेवासा  ८६००२३६९९९ किंवा ८३२९६१८२७१ वनरक्षक ९६७३९६२६६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments