नगर बुलेटीन

 नगर  बुलेटीन 

साखर कामगाराच्या मुलाला जिल्हाध्यक्ष करण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षामध्येच 


 किरण काळे :स्मितलभैय्या वाबळे यांच्या निवडीबद्दल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार

वेब  टीम नगर : एका सामान्य साखर कामगाराच्या मुलाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्ष करायची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली

स्मितलभैय्या वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी काळे बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, डॉ.रिजवान अहमद, डॉ.दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनीताई गायकवाड, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे चिरंजीव गाढवे, प्रमोद अबुज, अमित भांड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

काळे पुढे म्हणाले की, स्मितलभैयां सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला जिल्हाध्यक्ष करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी केले आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका नामदार बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांची आहे. 

यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफरे म्हणाले की, स्मितलभैय्या जिल्ह्यामध्ये युवकांची संघटना सक्षमपणे बांधतील. त्यांनी लवकरात लवकर जिल्ह्याचा दौरा पूर्ण करत युवक संघटनेचा आढावा घ्यावा. गाव तिथे काँग्रेस आणि वार्ड तिथे शाखा हा कार्यक्रम करावा युवक काँग्रेसने राबवावा. 

यावेळी यश भोंगे, जाहिद अखतार, इम्रानभाई बागवान, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, महेश लोंढे, प्रशांत जाधव, संकेत लोकरे, मयुर सोनवणे, केतन खरपुडे, सागर बोराडे, गोपाल नायडू, आदित्य यादव, मनोज उंदरे, मयूर सोनवणे, आदित्य यादव, महेश लोंढे, अमित मोमीन, अभिजीत कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

स्मितल वाबळे यांना आले गहिवरून 

सत्काराला उत्तर देताना स्मितलभैय्या वाबळे यांना गहिवरुन आले. माझ्यासारख्या एका कामगाराच्या मुलाला सोळा वर्ष विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेसच्या माध्यमातून निष्ठेने थोरात-तांबे परिवार आणि काँग्रेस समवेत निष्ठेने केलेल्या कामाची पावती मला जिल्हाध्यक्ष करून दिली. याचा आनंद मला आहेच. पण माझ्यापेक्षा जास्त मोठा आनंद हा माझ्या कामगार म्हणून काम केलेल्या वडिलांना आहे. आपल्या भावना व्यक्त करत असताना वाबळे यांना गहिवरून आल्यामुळे उपस्थित काहीवेळ स्तब्ध झाले होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिंदसेवा मंडळाच्या भाईसथ्था नाईट हायस्कूलतर्फे 

माजी अध्यक्ष  एल.जी.गायकवाड यांना श्रद्धांजली    

एल.जी.गायकवाड हे हिंदसेवा मंडळाचे अभ्यासू   सभासद-संजय जोशी                                                       

वेब टीम नगर- एल.जी.गायकवाड हे हिंदसेवा मंडळाने अभ्यासु सभासद होते.हिंदसेवा मंडळाच्या भाईसथ्था नाईट हायस्कूलचे माजी अध्यक्ष म्हणून २०११ ते २०१५ या कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.तसेच भाजपचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी नगर शहरातही अनेक कामे केली आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हिंदसेवा मंडळात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सामाजिक,शैक्षणिक व राजकीय सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान होते. असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.                                                                          

 हिंदसेवा मंडळाचे आजीव सभासद व भाईसथ्था नाईट हायस्कूलचे माजी अध्यक्ष  व  लक्ष्मण गोविंद उर्फ एल.जी.गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच हिंदसेवा मंडळाच्या भाईसथ्था नाईट हायस्कूलतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी बोलत होते.यावेळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,कार्याध्यक्ष अजित बोरा, उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी ,सारडा महाविद्यालयाच्या जुनिअर कॉलेजचे चेअरमन अँड. अनंत फडणीस,उपाध्यक्ष रणजित श्रीगोड,अधिक जोशी,सहायक सचिव बी. यु.कुलकर्णी,प्राचार्य सुनील सुसरे, अनिरुद्ध देशमुख,आदींसह हिंदसेवा मंडळाचे पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.        हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक म्हणाले कि,एल जी गायकवाड यांनी हिंदसेवा मंडळात निरपेक्षपणे सातत्यपूर्ण  शैक्षणिक कार्य केले आहे.हिंदसेवा मंडळ व अहमदनगर जिल्हा वाचनालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.                                                                                                                                    

अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी म्हणाले कि,गायकवाड यांनी भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष असताना २०११ ते २०१५ या कालावधीत उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांच्या कामाच्या अनुभवामुळेच मी अध्यक्ष  म्हणून चांगले काम करीत आहे.रात्र प्रशालेच्या जडणघडणीत गायकवाड यांचे मोठे योगदान आहे.                                                  कार्याध्यक्ष अजित बोरा म्हणाले कि,गायकवाड यांनी हिंदसेवा मंडळात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. बोरा परिवार तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो.                                                                                                                  अँड.अनंत फडणीस म्हणाले कि,गायकवाड यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे.रात्र प्रशालेतील शिक्षकांनीही माजी अध्यक्ष  एल.जी.गायकवाड(आण्णा)यांचे अनुभव कथन करून भावना व्यक्त केल्या.    

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

   शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत करावे : शहराध्यक्ष प्रसाद शिंदे 


वेब टीम नगर : शासन परिपत्रका नुसार शासकीय , निमशासकिय आधिकारी कर्मचारी यांचे वेतन कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत असावे असे पत्र शासनाकडून  मिळाले असुनही. प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे  पगार राष्ट्रीयकृत बँकेत  नियमित होत नाहीत.  तसेच अनेक ऑनलाईन   बँकेच्या व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँक असणे आवश्यक आहे.व्यवहारात सु-सूत्रता यावी .शिक्षकांना नियमित व्यवहारा करण्यासाठी फायदा व्हावा यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत   शिक्षकांना या बाबतीत आपले खाते कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत वेतन जमा होण्यासाठी  मुभा देण्यात यावी यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय प्राथमिक माध्यमिक विभाग तसेच वेतन अधिक्षक कार्यालय अ,नगर निवेदन येथे देण्यात आले.या प्रसंगी शिंदे यांनी माहिती दिली आहे की 

सध्या शिक्षकांचे  पगार राष्ट्रीयकृत     बँकेत जमा होत नसल्याने  कर्मचाऱ्याचे खूप नुकसान होत आहे. काही बँका    वेळेवर पगार बील जमा न करणे. ऑनलाईन कोणतीच कामे या बँकेमार्फत होत नाही. कर्मचाऱ्याचा विमा संरक्षण नाही.कर्ज सुविधा नाही. चेक बुक दिरंगाई, क्रेडिट कार्ड नाही. चेक लवकर पास होत नाही अशा खूप अडचणी असून सुद्धा आपल्या जिल्ह्यात असा आग्रह का ?इतर जिल्यात पगार राष्ट्रीय बँकेत जमा होतात मग अ.नगर  जिल्ह्यातील शिक्षकांवर  अन्याय क  हें समजत नाही. 

कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून  सर्व शिक्षकांच्या वतीने निवेदन दिले आहे  .  शासनाचे आदेश नियम असून सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत का नाही  असा मोठा प्रश्न कास्ट्राईब संघटनेला पडला आहे. संघटनेच्या वतीने हा अन्याय दूर व्हावा ही विनंती शिक्षणाधिकारी यांना  करण्यात येत आहे.

 या बाबतीत शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने  त्वरित आदेश निर्गमित करावा तसेच या बाबतीत सर्व प्रक्रिया प्रत्रकाद्वारे प्रसिद्ध करावे. आणि सदर शासन निर्णयाचा सर्व शिक्षकांना फायदा मिळून द्यावा.अशी मागणी शहराध्यक्ष प्रसाद  शिंदे यांनी केली.या प्रसंगी संघदनेचे पदाधिकारी,कांतीलाल खुरंगे,भाऊसाहेब पुंड,राहुल मोरे, मार्टीन पारधे, रविंद्र आगलावे उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत 

असलेले उपक्रम समाधानकारक -श्रीकांत मायकलवार

    वेब टीम  नगर : एखाद्या शहराची ओळख तेथील सोयी-सुविधा, रचनात्मक कामे, स्वच्छता, सुशोभिकरणाबरोबरच तेथील धार्मिक स्थळांमुळे शहराच्या वैभवात भर पडत असते. नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा कौतुकास्पद असाच आहे. कोरोनाच्या पार्श्वखभुमीवर मंदिर बंद होती आता ती सुरु झाली आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था व सुविधांही चांगल्या पद्धतीची असणे गरजचे आहे. श्रीविशाल गणेश मंदिराच्यावतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.

     शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी भेट दिली असता,  त्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वीस्त रंगनाथ फुलसौंदर, पांडूरंग नन्नवरे, श्यामराव व्यवहारे, प्रा.सुजित बेडेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी पंडितराव खरपुडे  यांनी मंदिराच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबरच मंदिरे खुली झाल्यानंतर शासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे, त्याच बरोबर भाविकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगच्या सूचना देऊन त्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. 

     देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे यांनी आयुक्त मायकलवार यांना मंदिराचा झालेल्या जिर्णोद्धाराच्या  कामाची माहिती दिली. यावेळी देवस्थानाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने चित्रकला स्पर्धाचे आयोजन 

    वेब टीम  नगर:तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशोक आर्ट फौंडेशनच्या सहकार्याने चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वेभूमीवर चित्र घरुनच काढून दिलेल्या पत्त्यावर रविवार दि. ६ डिसेंबर२०२० रोजी पोहोच करावयाची आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंगळवार दि.८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वा. संताजी भवन, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, दाळमंडई, अहमदनगर येथे होईल, अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले यांनी दिली.

     स्पर्धेसाठी १ ली - २री, ३री - ४ थी, ५ वी -६वी,७वी - ८ वी, ९ वी - १०वी तसेच महाविद्यालय / कला महाविद्यालयीन विद्यार्थी असे एकूण सहा गटात ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटानूसार स्वतंत्र्य पारितोषिके, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. परिक्षाकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.

     चित्र पोहच करण्यासाठी नगर शहरातील १) तिळवण तेली समाज ट्रस्ट कार्यालय, संताजी भवन, दाळमंडई,२) अशेाका आर्ट गॅलरी, प्रोफेसर चौक, सावेडी ३) सागर ऑईल, भिस्तबाग चौक, सावेडी४)किशोर ऑईल, गुलमोहोर रोड, सावेडी, ५) डोळसे तेल विक्री केंद्र, भुतकरवाडी चौक, सावेडी,६) रामदास महाराज क्षीरसागर, प्लॉट नं.१० रेणुकानगर, केडगांव,७) गणेश शंकरराव डोळसे, जलकल्याण रक्तपेढीजवळ, नालेगांव, ८) शशिकांत शिंदे, पवन नागरी पतसंस्था, सर्जेपुरा, ९) डोळसे तेल विक्री केंद्र, जुना बाजार, १०) अंबिका तेली उत्पादक सोसायटी, नेता सुभाष चौक, ११) गणेश ढवळे, कलेक्टर कचेरी जवळ, श्रीकांत ऑईल डेपो. या सेंटरवर चित्र जमा करावयाचे आहे.

     अधिक माहितीसाठी ७४२०९४११११,९५६१२१७७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्षा निता लोखंडे यांनी केले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामपंचायत निवडणूक तयारीची ससाणेंनी केली मुरकुटेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात

वेब टीमश्रीरामपूर:  आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुक्यात वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, पुढील रणनिती ठरविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी कंबर कसली असताना नेत्यांनी देखील त्याची सुरुवात केली असून तालुका काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे निमित्त साधून येथील श्रीरामपूर तालुका अप्लसंख्यांक तालुकाध्यक्ष नाना मांजरे यांच्या निवासस्थानी नूतन पदधकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

 ससाणे व गुजर यांच्या हस्ते अप्लसंख्यांक तालुकाध्यक्ष नाना मांजरे, तालुका काँगेस कमिटीचे उपाध्यक्ष पाराजी गायधने व निपाणी वाडगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे समन्वक प्रशांत राऊत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी मार्गदर्शन करताना करण ससाणे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील सर्व समस्या सोडविल्या जातील. जोशी वस्ती परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना गावात आमदार निधीतून होणाऱ्या कामाचे ठिकाण बदलून तो निधी जोशी वस्ती परिसरात वापरण्याची मागणी केली असता त्याबाबत आमदार कानडे यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच जोशी वस्ती परिसरामध्ये पाटाच्या पक्क्या पुलाच्या कामाबाबत लक्ष घातले जाईल असे आश्वासन दिले. गावातील ससाणे गटाने यापूर्वी दोन वेळेस मुरकुटेंच्या बाले किल्ल्यात सत्ता मिळविलेली असून यावेळी देखील चांगले वातावरण तयार झाले असून कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सकारात्मक विचार करून कामे करून जनतेचा विश्वास संपादन केल्यास ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर अटळ आहे असे शेवटी ससाणे म्हणाले. 

आ. लहू कानडे, करण ससाणे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या समस्या सोडविल्या जातील असे नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पापभाई शेख होते. यावेळी मा. उपसरपंच सर्जेराव देवकर, सुनील घोरपडे, संभाजी देवकर, मा. उपसरपंच बाळासाहेब गायधने, मा. सरपंच अशोक भालेराव, नवशिराम एकनर, चांगदेव गोराणे, सूर्यभान गायधने, बंडू उंडे, विठ्ठल सोनवणे, राजेंद्र राऊत, मिलिंद इनामके, आबा गायधने, गणेश गायधने, भागचंद राऊत, राजेंद्र पवार, राजेंद्र देवकर, भैया कुरेशी, बाबन शेख, रऊफ भाई सय्यद, अकील पठाण, नितीन जाधव, आनंदा साळवे, बाजीराव गोर्डे, आयुब पठाण, नाथा मांजरे, दौलत मोरे, सचिन दासरजोगी, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.     

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी : जिल्हा तैलिक महासभेची मागणी

    वेब टीम  नगर : महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संतांजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.

      शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संतांजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.  सदर फोटो फ्रेम मिळण्यासाठी  श्री संताजी  फ्रेम वर्क, परसराम सैंदर, शिंपीगल्ली, तेलीखुंट, नगर. श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासमोर, नगर. ओंकार सुपर स्टोअर्स, महाजनगल्ली, नगर किंवा अधिक माहितीसाठी हरिभाऊ डोळसे (मो.९८२२२७१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.         

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर.


वेब टीम नगर :  वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे. 

नवीन कार्यकारिणी मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून प्रतिक बारसे (अध्यक्ष) व योगेश साठे (महा सचिव) यांच्या बरोबरच ५ उपाध्यक्ष, ३ सचिव, ६ संघटक, ३ सल्लागार व १ प्रसिद्धी प्रमुख अशी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 

नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाने प्रतिक बारसे (जिल्हाध्यक्ष - अहमदनगर दक्षिण), योगेश साठे (महासचिव - अहमदनगर दक्षिण), सुरेश कोंडलकर (कर्जत), योगेश सदाफुले (जामखेड), अरविंद सोनटक्के (पाथर्डी), बंन्नो शेख (शेवगाव), संतोष गलांडे (श्रीगोंदा) अशा ५ उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रकांत नेटके (कर्जत), सुनिल बाळू शिंदे (श्रीगोंदा), बाळासाहेब कांबळे (नगर तालुका) असे ३ सचिव तसेच फिरोज पठाण (नगर शहर), नंदकुमार गाडे (कर्जत), भीमराव चव्हाण (जामखेड), दत्तात्रय अंदुरे (पाथर्डी), सुरेश खंडागळे (शेवगाव) अशा ६ संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे प्रा. जीवन पारधे (अहमदनगर शहर), चंद्रकांत डोलारे (कर्जत), वसंत नितनवरे (श्रीगोंदा) अशा ३ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भगवान राऊत यांची प्रसिद्धी प्रमुख पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा कार्यकरिणीमध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी अहमदनगर दक्षिण मधील तालुकाध्यक्षांनी लवकरात लवकर आपापल्या तालुक्यातील ५ कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत तसेच संपूर्ण जिल्ह्यातील शहर, तालुका, गाव, गण, यासाठी देखील कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे व महासचिव योगेश साठे यांनी केले आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने 

भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान

नातेवाईकांनी घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन 

वेब टीम नगर : घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भूमी गुंठा आवास योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून इसळक-निंबळक येथे घरासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, गरजू घटकातील घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी संघटनेच्या वतीने रविवार दि.६ डिसेंबर रोजी भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

राज्य व केंद्र सरकार घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यास दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेने स्वत: शहरालगत जागा शोधून लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर भूमी गुंठा आवास योजना सुरु केली. इसळक-निंबळक येथे २३०घरांचा प्रकल्प उभा राहत असताना, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात एक गुंठा जमीन मिळणार आहे. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय सरकारी योजनेतून घरासाठी त्यांना ५० हजार रुपये देखील अनुदान मिळणार असल्याने घरकुल वंचितांना ही जागा अवघ्या ३० हजार रुपयातच उपलब्ध होणार आहे. मात्र गरजू घटकातील घरकुल वंचितांकडे जागेसाठी पैसे उपलब्ध नसल्याने त्यांचे घरांचे स्वप्न साकार होण्यासाठी नातेवाईकांनी आर्थिक मदत देण्याच्या भावनेने भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये आपल्या घरकुल वंचित नातेवाईकाला घरासाठी मदत करणार्‍यांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. बाळासाहेब सुंबे यांनी आपल्या गरीब बहिणीला घराच्या जागेसाठी आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचा रविवारी सन्मान केला जाणार आहे. तसेच घरे नसलेल्या आपल्या नातेवाईकांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

सरकारवर विसंबून न राहता घरे होण्यासाठी नातेवाईकांनीच मदत करण्याची अपेक्षा आहे. आपल्या गरजू नातेवाईकास घर होण्यासाठी मदत केल्यास घरांचे स्वप्न साकार होणार आहे. राजधर्मापेक्षा नातेधर्म मोठा असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.  भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान कार्यक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले, संतोष अडागळे प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments