भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे

शिष्यवृत्ती परीक्षेत यश

आडेप, शित्रे व पुराणिक राज्याच्या गुणवत्ता यादीत


वेब टीम नगर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तन्मय आडेप (इयत्ता ५वी) राज्यात तीसरा व जिल्ह्यात प्रथम येऊन शाळेचे २६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराली शित्रे राज्यात पंधरावी, कैवल्य पुराणिक (इयत्ता ८वी) राज्यात सतरावा येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तसेच जिल्हा यादीत ३२ विद्यार्थी चमकले आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेत (इयत्ता ५ वी) जिल्ह्यात तेरावा- ओंकार चेमटे, चौदावा- चैतन्य कार्ले, अठरावा- यशोधन सोनवणे, पंचवीसावा- सुमेध मजूमदार, एकोणत्तीसावी- आविष्कार लगड, तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) जिल्ह्यात चौदावा- विराज कापसे, सोळावा- कार्तिक बोरुडे, सतरावा- उत्कर्ष मोरे,  एकोणीसावी- ईश्‍वरी सागर, बावीसावी- सुचित्रा सोनार यांनी येण्याचा मान पटकावला आहे. या परीक्षेत राज्य व जिल्हा यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गाधी, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य दिलीप कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय पडोळे, रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य यांनी अभिनंदन केले आहे.  



Post a Comment

0 Comments