पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करतात

 पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करतात

महेश घोडके : ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता , मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी धनादेश स्विकारुन जागेची नोंदणी सुरु

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने वंचितांची प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान करण्यात आला. तर इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या प्रकल्पाचे धनादेश स्विकारुन जागेची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात मकरंद घोडके यांचा लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके यांच्या हस्ते तर ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यांना त्यांच्या घरी सुभाष मुथा यांच्या हस्ते मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, प्रकाश भंडारे, वसंत लोढा, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, सोमनाथ अडाग़ळे, पोपट भोसले, नामदेव अडागळे, सखुबाई बोरगे, शशीकला पेद्राम, किशोर मुळे आदिंसह घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके म्हणाले की, पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करीत असतात. सत्य समोर आनण्याचे धाडसी काम आजपर्यंत पत्रकारांनी केले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबध्द आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांनी वंचितांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले असून, त्यांना दिलेला सन्मान योग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वसंत लोढा यांनी घरकुल वंचितांना घरे मिळवून देण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व मकरंद घोडके यांनी समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य सुरु केलेले असून, वंचितांच्या पाठिशी नेहमीच उभे राहणार असल्याचे सांगितले. तर घरकुल वंचितांचा प्रश्‍न सहा वर्षाच्या संघर्षानंतर एकजुटीने पुर्णत्वास जाणार असल्याची भावना व्यक्त केली.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, लोकशाहीचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी माध्यमांवर आहे. कॉन्टम फिजिक्स मधील ऑब्जर्वर्स इफेक्ट या तंत्राप्रमाणे देशातील लोकशाहीमध्ये चेक अ‍ॅण्ड बॅलन्सचे काम पत्रकार करीत असतात. वंचितांचे प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार्‍या पत्रकारांचा सन्मान होणे अत्यावश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार घटकामुळे समाज सावरला असल्याचे सांगितले.

 घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात १गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होत आहे. सदर प्रकल्पात २३१ घरे उभारण्यासाठी प्रत्येकी एक गुठ्याचे प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जागा घेऊ इच्छिणार्‍या घरकुल वंचितांचे धनादेश या रविवार पासून स्विकारुन त्यांच्या जागेची नोंद सुरु करण्यात आली आहे. घरकुल वंचितांनी धनादेश देऊन जागेची नोंद करुन घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments