डॉ. शीतल आत्महात्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे

डॉ. शीतल आत्महात्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे 

वेब टीम नगर ; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे–करजगी यांचा सोमवारी मृत्यू झाला. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतले असल्याची माहिती समोर आली. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे . 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. चंद्रपूरच्या आनंदवन ग्रामपंचायत विभागात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी नागपूरहून विशेष तपास पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणं शक्य आहे अशी माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. 

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. 

दरम्यान आमटे कुटुंबियांकडून शीतल यांच्या आत्महत्येवर पहिली प्रतिक्रिया आली असून वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना दिगंत आमटे म्हणाले कि आमच्या साठी हे सर्व अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे यापुढे प्रतिक्रिया त्यांना शब्द सुचले नाहीत वृत्त वाहिन्यांसमोर हात जोडून ते तिथून निघून गेले. 

 

Post a Comment

0 Comments