भाजपा युवा मोर्चाच्या उपोषणाच्या इशाऱ्याने भिंगार मधील प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी

 भाजपा युवा मोर्चाच्या उपोषणाच्या इशाऱ्याने 

भिंगार मधील प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी


वेब टीम नगर – भिंगार शहरातील वाघस्कर गल्ली, दाणे गल्ली, डपकर गल्ली भागात अनेक वर्षापासून नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. या परिसरातील नागरिक छ्वणी परीषेदेचे सर्व देयके प्रमाणिकपणे वेळेवर भरत आहेत. तरीही नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. याबाबत भाजपच्या वतीने हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र प्रत्तेक वेळी प्रशासनाने केवळ आश्वासने दिली. याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने शहराध्यक्ष किशोर कटोरे यांनी भिंगार छावणी परिषदे मुख्याधिकारी विद्याधर पवार यांना 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा निवेदन देवून त्वरित नवी पाईपलाईन टाकण्याचे काम सरू केले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्याधिकारी विद्याधर पवार यांनी त्वरित काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भिंगार शहरातील वाघस्कर गल्ली, दाणे गल्ली, डपकर गल्ली भागात नव्याने पाईपलाईन टाकण्यच्या कामास प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली असून कामाची निविदा प्रक्रियाही सुरु केली आहे.

            भिंगार छावणी परिषदेचे  मुख्याधिकारी विद्याधर पवार यांनी भाजपा युवामोर्च्याच्या निवेदनाची त्वरित दखल घेवून कामस मंजुरी देवून दिलेले आश्वासन पाळल्याबद्दल भिंगार भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी विद्याधर पवार यांचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments