श्री विशाल गणेश मंदिर आजपासून होणार खुले

श्री विशाल गणेश मंदिर आजपासून होणार खुले  

विश्वस्त च्या बैठकीत झाला निर्णय - अध्यक्ष ॲड.अभय आगरकर  

वेब टीम नगर - नगर शहर चे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर कोविड-१९ मुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते .परंतु आता येत्या सोमवार पासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे .त्यामुळे शहर चे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर च्या ट्रस्ट पदाधिकारी यांची रविवारी साय पाच वाजता अध्यक्ष ॲड.अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये शासनाने घालून दिलेले नियामचे पालन करून काही नियमावली तयार करण्यात आली ती खालील प्रमाणे 1) कोणत्याही भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही 

2) मंदिरच्या वतीने सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात करून देण्यात येईल.सॅनिटायझ झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश नाही 

3) मंदिर उघडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्यकाळी ४ ते ७ यावेळेमध्ये भाविकांसाठी खुले राहील 

4) आरतीच्या वेळेमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही 

5)  एका वेळेस फक्त १५ भाविकांना मंदिरमध्ये प्रवेश दिला जाईल. 

6) जेष्ठ नागरिक व १० वर्षाच्या आतील मुलांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे 

वरील सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यात येणार असल्याचे अभय आगरकर यांनी सांगिलते 

भविष्य काळात परिस्थिती पाहून यामध्ये बदल केला जाऊ शकतो .दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सदरील गोष्टीचा विचार करून मंदिरास सहकार्य करण्याचे आवाहन टस्टच्या वतीने करण्यात आले आहेत 

सोमावरी सकाळी ९ वाजता सनी चोघडा च्या मंगलमय वातावरणात मंदिर उघडले जाईल  

तसेच देवस्थान ट्रस्ट च्या  शनी-मारुती मंदिर बाबत देखील अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले 

सदरचा निर्णय कठीण जरी असला तरी भाविकांची सुरक्षितता यांना प्रथम प्राधन्य देण्यात आले आहेत त्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले 

यावेळी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे ,सचिव अशोकराव कानडे ,विस्वस्त विजय कोथींबीर ,हरिचंद्र गिरमे ,चंद्रकांत फुलारी ,पांडुरंग नन्नवरे ,रंगनाथ फुलसुंदर ,गजानन ससाणे , Post a Comment

0 Comments