दिवाळी विशेष: 'लाल' चं महत्व

दिवाळी विशेष 

'लाल' चं  महत्व


रंगामध्ये लाल  रंग उठून दिसणारा आहे लक्ष वेधून घेणारा आहे .'लाल' म्हणजे तांबडा अंजनीसुत पवन पुत्र हनुमान चैत्र पौर्णिमेला सुर्योदय होत असतानाच अवतरले जन्मल्याबरोबर उगवता सूर्य हा 'लाल' रंगाचे  फळ आहे असे समजून त्याला घेण्यासाठी बाल हनुमानाने उड्डाण केले, त्याचा संदर्भ आपल्याला' लाल' शेंदूर लेपित हनुमानाच्या मूर्ती मंदिरात विराजमान झालेल्या दिसतात, काही देवताही लाल शेंदूर लेपित पाहायला मिळतात उदाहरणार्थ माहूर गडावरील रेणुका माता सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी श्री गणेशाच्या मूर्तीही ही लाल शेंदूर लेपित असतात 'लाल शेंदूर चढायो'हे हिंदीमधील वाक्य आपल्याला माहिती आहे

         सूर्योदयाचे वेळी पूर्व क्षितिजावर लाल रंग पसरलेला दिसतो.  सूर्याच्या लालिया आकाशात पसरलेला पाहून पक्षांची किलबिल आणि खाद्यासाठी चा संचार सुरू होतो तसेच मावळतीला ही सूर्य पश्चिम आकाशात लाल रंगाची उधळण करीत असतो . उगवतीच्या व मावळतीच्या आकाशातील हे दृश्य आपल्याला आनंद देणारं असतं डोंगर कड्यावरुन सूर्योदय-सूर्यास्त असं निरीक्षण करत आनंद घेणे हे सहलीतील एका निसर्ग एक निसर्गातील क्षण टिपण्याचा अनुभवण्याचा प्रसंग असतो उदयास आला सूर्य लाल रंगाचा दिसतो आपल्या ग्रहमालेतील मंगळ हा ग्रह लाल रंगाचा दिसतो.  

प्राण्यांच्या शरीरातील रक्त हे 'लाल 'रंगाचं असतं त्यावरून रक्तवर्ण म्हणजे लाल रंगाचा हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे प्राण्यांची जीभही लाल रंगाची असते कुंकू लाल रंगाचं असतं स्त्रिया सौभाग्याचा म्हणून लाल  रंग असलेल्या कुंकवाला महत्त्व आहे.  लाल रंगाची मेंदी ही निसर्गाने महिलांसाठी निर्मिलेली सौंदर्य अलंकार आतील एक भूषण आहे . लाल रंगाचा गुलाल उधळून अनेक सण-उत्सव साजरे केले जातात, होळीची रंगपंचमी ही लाल रंग सहित खेळली जाते.  वाढदिवस स्वागत समारंभ लग्न सोहळा उद्घाटन आधी आनंद उत्सव प्रसंगी लाल गुलाब पुष्प देऊन आमंत्रित स्वागत केलं जातं लालीलाल हा शब्दप्रयोग ही वापरात आहे पदलालित्य हे त्याचेच निदर्शक आहे लाल रंगाची वस्त्रप्रावरणे ही लक्ष वेधून घेणारे असतात लाल रंगाचे महत्त्व येथे अधोरेखित होतं एका सिनेमा गीतामधील शब्द आठवतात

"लाल छडी मैदान खडी क्या खूब लडी क्या खूब लडी"

निसर्गाने मानवाला बहाल केलेली अनमोल भेट म्हणजे विविध रंग मानव आणि रंग यांचे अतूट नाते निर्माण होऊन त्यातून भावभावनांचे प्रगटीकरण होऊ लागले रंगांनी जीवनात रंगत आणली निसर्गातील अनेक घटक 'लाल' रंग परिधान करून आपलं लक्ष वेधून घेतात रक्तचंदन रगतरोडा लाल गुलाब लाल जास्वंद असे वनस्पती मधील लाल रंग असलेले घटक आहेत आणि पशू पक्षांनीही डोळे पंख असे लाल रंगाचे अवयव धारण केलेले आहेत फुलांमध्ये गुलाब, जास्वंद, पळस, गणेश पुष्प ,लाल चाफा, लाल काटेसावर असे अनेक प्रकार आहेत शरदऋतु मधील पानगळ सुरू झाल्यानंतर बदामाच्या झाडाची पिकलेली पाने लाल रंगात परिवर्तन होऊन घडायला लागतात परावर्तित होऊन गळायला लागतात व भूमीवर पडल्यावर वेगळेच दृश्य आपल्याला दिसतं.  टरबूज डाळिंबाचे दाणे सफरचंदाची साल टोमॅटो, गाजर हे लाल रंगाचे असलेली फळे कंद आपल्या अन्नघटकांचा भाग आहेत. 

दिल्लीमधील लाल किल्ला पुण्यातील लाल महाल ऐतिहासिक ठिकाणे आपले लक्ष वेधून घेतात लाल किल्ला बांधतांना ढोलपूर लाल खडकाचा वापर केलेला आहे आग्ऱ्याचा किल्ला, फतेहपुर सिक्री येथील अनेक इमारती दिल्ली संसद भवन राष्ट्रपती भवन, जयपूरचे  उमेदभवन, लाल महाल अशा अनेक ठिकाणच्या वास्तूच्या बांधकामात लाल रंगाचा दगड वापरलेला आहे कोकण गोवा या सह्याद्री घाटाच्या परिसरातील डोंगर टेकड्या माती या लाल रंगाच्या असलेल्या आपल्या निदर्शनास येतात लाल रंग दिलेल्या घराच्या भिंती लाल रंगाच्या कौलारू आकारलेली घरे दिसतात कामगारांचा लालबावटा म्हणजे निशाण प्रसिद्ध आहे लाल रंग ऊर्जेचं तेजाचा  प्रतीक आहे लाल रंगाच्या तांबड्या धातूचे महत्त्व तेथे अधोरेखित होते श्री म्हाळसाकांत म्हणजे खंडोबा तळी भंडार रचनेतील एका ओळीतील शब्द पहा अंगावर शाल सदा हि लाल एका गीतातील शब्द पहा रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला. 


श्री रामायणातील एक प्रसंग यातील वर्णन पहा भरता बरोबर कैकयी  सुद्धा श्रीरामांना परत आणण्यासाठी चित्रकूटला गेली त्याप्रसंगी श्रीराम म्हणतात सौ बार धन्य वह एक लाल की माई। जिसने दिया है मुझे भरत जैसा भाई।। असे म्हणून श्रीरामाने पहिले वंदन कैकयीला केले श्री दत्त महात्म्य ग्रंथांमधील एक प्रसंग राजाचा अश्रुपात पाहून पावसाळ्यात वर्षाव करणाऱ्या ढगाला ही लाज वाटली आश्चर्य वाटले त्यांनी जरासे डोळे उघडले तर ते रडून रडून लाल झाले होते त्यांचा लालिमा पाहून आकाशात उदयाला येणाऱ्या सूर्यालाही आपल्या लाल रंगाची लाज वाटली. 

मानवांनी धारण केलेल्या नावातही लाल  चे महत्व कसे आहे ते पहा १९६५ साली  मी अहमदनगर महाविद्यालयात शिकत असताना तर्कशास्त्र हा विषय गोखले सर शिकवीत असत त्यांना तर्फे शास्त्रीय दृष्ट्या सांगितलेलं व काळाशी सुसंगत असलेलं एक विधान लक्षात घेण्यासारखे आहे त्यावेळी ते म्हणाले नावातला असलेली व्यक्ती पंतप्रधान होते उदाहरण देताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री ,गुलजारी लाल नंदा त्यांची नावे सांगितली या प्रत्येकाच्या नावात लाल शब्द आला आहे.  तसेच नावानं लाल असलेली ही काही नावं लालूप्रसाद, लाला लजपत राय, देवीलाल, मनोहरलाल, मोतीलाल, मोहनलाल ,लालचंद, लालासाहेब, लालजी, चंदनलाल, पोपटलाल, भोगीलाल इत्यादी याचा अर्थ ज्यांच्या नावातच लाल आहे अशा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवितात महाकवी कालिदास म्हणतात उगवताना आणि मावळताना सूर्यबिंब लाल दिसते त्याप्रमाणेच सांपत्तिक स्थिती उत्तम असो की विपन्नावस्था महापुरुषांची वर्तणूक दोन्ही स्थितीमध्ये समानच असते. 

लाल रंग हा धोका आहे असा संदेश देणारा ही आहे शहरांमधील ट्रॅफिक सिग्नल वर सर्वात वरचा सिग्नल हा लाल रंग दर्शविणारा आहे याचा अर्थ थांबा पुढे जाऊ नका लाल रंग पाहिला की रक्ताची आणि रक्तपाताच्या धोक्याची भावना मनात जागृत होते म्हणूनच थांबा असे सांगण्यासाठी लाल रंगाची निवड झाली आहे.  लाल रंगाचे निशाण फडकवले तर तो थांबण्यासाठी इशारा असतो पुढे धोका आहे हे तो दर्शवितो विशेषता प्रवास करताना सावधगिरी बाळगा हा त्यामागचा उद्देश असतो 2020 सालातील कोरोना ने निर्माण केलेल्या रेड झोन च्या पार्श्वभूमीवर एका सिनेमातील शब्द आठवतात ते असे 'ये लाल रंग कब मुझे छोडेगा' एखाद्याच्या गालावर थप्पड मारल्यावर त्याचे गाल लाल होतात अर्थ म्हणजे लाल भडक रंग.   रंग द्या दया आणि  करुणा यांचेही प्रतीक आहे उगवत्या सूर्याच्या प्रकाशात एवढी तेजस्वी असलेल्या देवीला उदयन भानू सहस्त्रआभा म्हटलेले आहे . लाल माणिक रत्न हे उपासना ध्यानयोग हरिभक्ती आणि प्रेम वाढविणारे आहे असं हे लाल महत्व सर्वांना अनुभवणार आहे. 

बाळासाहेब कुलकर्णी

 प्लॉट नंबर 1 / 3 रघुसीना अपार्टमेंट, 

नातूबाग, १८८४ सदाशिव पेठ,   

 पुणे 4110 30


Post a Comment

0 Comments