गावठी कट्टे बाळगणारे " ते" दोघे अटकेत

 गावठी कट्टे बाळगणारे " ते" दोघे  अटकेत 

वेब टीम नगर : दि.२६-११-२०२० रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर जिल्हा धुळे येथून दोन इसम अहमदनगर येथे बेकायदेशीर गावठी कट्टे व काडतुसे विक्री करता घेऊन येणार आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश इंगळे पोलीस हेकॉ मनोज गोसावी दत्ता गव्हाणे बाळासाहेब पोना  सचिन आडवल विशाल गवांदे पोकॉ शिवाजी ढाकणे सत्यजित जाधव पोलीस हेकॉ संभाजी कोतकर रवींद्र मुंगसे दीपक शिंदे रवी किरण सोनटक्के यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तारकपूर बस स्थानक अहमदनगर येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून थांबले असता दोन इसम संस्थेत रित्या फिरताना दिसले या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे पत्ता विचारला असता त्यांची नावे चुन्नीलाल सुधाराम पावरा वय २१ (रा.हिवरखेडा ता.शिरपूर जि.धुळे) आणि दिलीप जयसिंग पावरा वय २०  (रा.अंबा ता.शिरपूर जि.धुळे) असे सांगितले त्यांची पंचायत समक्ष पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश इंगळे यांनी अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडती मध्ये सात हजार चारशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आल्याने ते जागीच जप्त करण्यात आले याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. 
Post a Comment

0 Comments