सामाजिक जाणीव ठेवत व्यवसाय करावा -आ.संग्राम जगताप
वेब टीम नगर - युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा चांगला व्यवसाय सुरु करून पायावर उभे राहण्यास प्राधान्य देणे ही काळाची गरज झाली आहे. सध्याच्या काळात व्यवसाय करतांना प्रामाणिकपणा बरोबरच सामाजिक बांधलकीची जाणीव जपत व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे. करोनामुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अश्या परिस्थितीत ‘डेली ऑफर बाजार’ या दालनाने सुरु केलेली अनोखी संकल्पना नागरिकांना दिलासा देवून फायदा करणारी ठरेल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
दिल्लीगेट जवळ नव्याने सुरु झालेल्या ‘डेली ऑफर बाजार’ या सुपर शॉपी दालनाचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकल असोसिएशनचे शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, शॉपचे संचालक संतोष सानप, अॅड. अनुराधा येवले, डेली ऑफर बाजारचे संयोजक आनंद शिंगी, विद्यार्थी फार्मसी परिषदेचे अध्यक्ष मनोज खेडकर, अभिनंदन वाकळे, सत्यजित धुमाळ, हर्षद बांगर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष सानप म्हणाले, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नारीकांनाची जास्तीतजास्त बचत होवून फायदा व्हावा यासाठी आनंद शिंगी यांनी डेली बाजार ऑफर ही नवी संकल्पना आणली आहे. या दालनातून कोणतीही दैनदिन वापराची वस्तू खरेदी केल्यावर त्या वस्तूवर एक वस्तू मोफत देण्याची ही योजना आहे. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा
0 Comments