पुन्हा लॉक डाउन झाले तर ...?
वेब टीम मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या येऊ घातलेल्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने राज्य पुन्हा लॉक डाउन कडे जाण्याची भीती राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.त्यामुळे राज्यातील जनता भांबावलेल्या स्थितीत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातून लॉकडाउन लावाण्याच्या प्रक्रियेला विरोध होत आहे. करोना रुग्णांची हळुहळू वाढत असलेली संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्याच्या उपायांवर भर द्यायला हवा. लॉकडाउन करून हा प्रश्न सुटणार नाही, याकडे वैद्यकीय क्षेत्राकडून लक्ष वेधले जात आहे.
अगदी शेवटचा पर्याय म्हणून लॉक डाउन कडे पाहायला हवे. लॉकडाउन केल्यामुळे आरोग्य यंत्रणेला पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळतो. पण त्यामुळे संसर्गाच्या सर्व शक्यता संपत नाहीत'. 'दिवाळीनंतर वाढलेल्या संसर्गाचे प्रमाण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्षात येईल. गर्दीच्या ठिकाणी वावर कमी करणे, सार्वजनिक सुरक्षेसाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे अधिक गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
रुग्णसंख्या वाढू नये यासाठी संसर्गप्रवण भाग कोणते, तेथील रुग्णसंख्यावाढीची गती याकडे लक्ष देऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राचे निकष लावायला हवेत. रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रित करण्यावर अधिक भर द्यायला हवा,लोकांनी मास्क लावले, सुरक्षित अंतरांचे निकष काटेकोर पाळले तर लॉकडाउन करण्याची वेळच येणार नाही. संसर्ग रोखणे, मृत्यूदर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्वांमध्ये आरोग्यसाक्षरता रुजवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र कोरोना संदर्भातील शासनाकडून आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
0 Comments