जिल्ह्यातील ११०० शाळा सुरु

 जिल्ह्यातील ११०० शाळा सुरु 

विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद 


वेब टीम नगर : देशात पहिल्या लॉकडाउन पासून बंद ठेवण्यात आलेल्या शाळा आज तब्बल ८ महिन्यानंतर सुरु करण्यात आल्या. नगर जिल्ह्यातही अनुदानित  आणि विना अनुदानित अश्या ११०० शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या. त्यात इ. ९ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गांचा समावेश आहे. मात्र ८ महिन्यानंतर सुरु झालेल्या शाळेला विद्यार्थी आणि पालकांनी अत्यंत अल्प असा प्रतिसाद दिला. 

ज्या शाळांची  ९ वी ते १२ वी  पटसंख्या ५५० इतकी आहे तिथेही उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० ते १५ इतकीच होती. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची ऑक्सिजन पातळी , तापमान, आदी तपासण्या करण्यात आल्या. शिवाय शैलीचे आणि विद्यार्थ्यांचे सॅनिटायजेशन करण्यात आले. विशेषता जिल्ह्यात अनुदानित ७१० शाळा असून तेथे अगदी नगण्य प्रतिसाद पाहायला मिळाला तर विनाअनूदानीत शाळांनी विद्यार्थ्यांचा नगण्य प्रतिसाद पाहून आणखीन महिनाभर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक शाळा प्रशासनाने घेतला आहे.

या संदर्भात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांच्याशी संपर्क साधला असता,शासनाने हा निर्णय घेण्यात घाई केली . अति घाई संकटात नेई अशी या निर्णयाची अवस्था झाली असून शासनाने या निर्णयाचा फेर विचार करावा असे सांगतानाच दिवाळी नंतर कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढतांना दिसत आहेत नागरमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३०० च्या घरात पोहोचली आहे. त्यातच काही शिक्षकांच्या कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्याने शिक्षकांची संख्याही रोडावली आहे. तर विद्यार्थ्यांची शाळा प्रशासनाने आणि सरकारने घ्यावी अशी पालकांची अपेक्षा असल्याने ते विद्यार्थ्यांना शाळे साठी संमती पत्र देण्यास तयार नाहीत. अशी प्रतिक्रिया दिली. 

Post a Comment

0 Comments