एनसीबीच्या पथकावर गुंडांचा हल्ला ....

 एनसीबीच्या पथकावर गुंडांचा हल्ला .... 

वेब टीम मुंबई: बॉलीवूड मधील अमली पदार्थांच्या संदर्भातील कनेक्शनची चौकशी करणाऱ्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पथकावर मुंबईतील गोरेगावात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनं राज्य सरकारच्या या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

या हल्ल्याच्या वेळी ६० जणांच्या आसपासच्या संख्या टोळक्याने या पथकावर हल्ला केल्याची ताहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात वानखेडे यांच्या पथकातील २ अधिकारी जखमी झाल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.कॅरी मॅंडिस या तस्कराला पकडण्यासाठी एनसीबीचे पथक गेले होते. अखेर मुंबई पोलिसांनी या पथकातील अधिकाऱ्यांना या हल्लेखोरांपासून वाचवले. या घटनेत पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. 

 बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन लवकरच उघड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या अनुषगांने एनसीबीनं ठोस पावलंही उचलली होती. पण, एनसीबी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळं भाजप नेते

आशिष शेलार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.


Post a Comment

0 Comments