आज तरी कंगना येणार का ?
वेब टीम मुंबई : कंगनाला आज पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश.आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली हिला मुंबईत पोलिसांसमोर हजर राहायचे आहे.यापूर्वी दोनदा समन्स पाठवूनही पोलिसांसमोर हजर राहिली नव्हती.आता पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला असून कंगना आणि रंगोली पोलिसांसमोर हजर होणार का? याची उत्सुकता आहे.दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कंगना आणि तिची बहीण रंगोलीच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले.तसेच झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट करून इस्लामी प्राबल्य म्हणून काढल्याच कंगना म्हणाली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप है दोघींवर लावण्यात आला.
चौकशीसाठी हजर होणार की नाही असा निरोप काल संध्याकाळपर्यंत पोलिसांना आलेला नाही. या आधी कंगना आणि रंगोली २६ ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबरला समन्स बजावण्यात आले होते. दोन्ही वेळेला कंगनाकडून टाळाटाळ करण्यात आली. भावाचे लग्न असल्याचे कारण देत कंगनाने १५ नोव्हेंबरपर्यंत येण्याची मुदत मागितली होती १५ नोव्हेंबर नंतरही कंगना कडून कोणताही प्रतिसाद पोलिसांना मिळाला नाही त्यामुळे कंगनाला तिसरा समन्स बजावूनही आज हजेरी लावते की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कंगना नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते काही दिवसांपूर्वी कंगनाने थेट महिला आयपीएस अधिकारीशी पंगा घेतला होता.कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून थेट आयपीएस अधिकारी रूपा मुदगल यांच्यावर निशाणा साधला आता रुपा यांना पोलीस खात्यावरचा धब्बा असल्याचे तिने म्हटले होते.तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीही केली होती.बांगलादेशी क्रिकेटर शाकिब अल हसन याच्या वक्तव्यावर ही कंगनाने टिपणी करून नव्या वादात उडी घेतल्याचं दिसून येत आहे.
0 Comments