का भडकला गोविंदा?

 का भडकला गोविंदा? 

वेब टीम मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील बेबनाव सर्वांना माहीतच आहे.मामा आणि भाचा मधला दुरावा कमी होण्याचं नाव घेत नाही.नुकतच गोविंदा कपिल शर्मा शो मध्ये गेला होता त्या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेक दिसला नाही, त्यानंतर त्यांच्यातील बेबनाव आणखीनच स्पष्ट झाला कृष्णाने जेव्हा गोविंदाच्या एपिसोड मध्ये काम केलं नाही त्या वेळी लोकांनी गोविंदाही या गोष्टीसाठी जबाबदार धरलं त्यानंतर कृष्णानं एक स्टेटमेंट दिलं ज्याच्यात कृष्णानी त्यांच्यातील बेबनावापुढे तो प्रचंड दुखी झाल्याचं सांगितलं.तर या गोष्टीवर आता गोविंदानेही तोंड उघडलं आहे.कृष्णाच्या काही गोष्टींमुळे तो इतका नाराज झाला आहे की नुकताच त्यांनी एका प्रेस रिलीज मध्ये सांगितलं कि मी कृष्णा काय म्हणाला ते वाचलं आहे त्यात त्यांनं आमच्या नात्यावरही  भाष्य केलं आहे.मात्र त्यात माझं नाव खराब करणाऱ्या अनेक कॉमेंट्स होत्या वास्तविक पाहता कृष्णा लहानपणापासून माझ्या परिवाराच्या अत्यंत जवळ आहे.  त्याला असं करून काय मिळतं ते मला माहित नाही.

 इतकेच नव्हे तर कृष्णाच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी देखील गोविंदा रुग्णालयात गेला नाही त्यावर बोलताना गोविंदाने मी माझ्या परिवाराबरोबर मुलांना बघायला गेलो होतो.मी तिथे डॉक्टर आणि नर्सला सुद्धा भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की कुटुंबातल्या कुठलाही सदस्य भेटलेला काश्मीरला आवडणार नाही.जेव्हा मी हट्ट केला तेव्हा आम्हाला लांबूनच मुलं दाखवण्यात आली. गोविंदा पुढे जाऊन असेही म्हणाला की ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल मनात माझ्याबद्दल गैरसमज आहेत तर मग त्यांची  चर्चा करून इमेज खराब होणार असेल तर मला ते आवडणार नाही. माझी स्वर्गीय आई म्हणायची की नेकी कर और दरिया मे डाल  बस मी तेच करत आहे. 

Post a Comment

0 Comments