राज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता ?

 राज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता ?


वेब टीम मुंबई : कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

उद्या पंतप्रधानांनीही सर्व राज्यातील मुखमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सध्या दिल्ली , गुजराथ येथील परिस्थिती बिकट होत चालली असून महाराष्ट्रही त्याच वाळणावर उभा असल्याने महाराष्ट्रात तातडीनं उपाय योजनांची अम्मलबजावणी केल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो त्यामुळे उद्याच्या बैठकीत पंतप्रधान काय निर्णय घेतात आणि महाराष्ट्र त्यांच्या उपायजोजनांना कसा प्रतिसाद देतो यावरच सर्व अवलंबून आहे. 

Post a Comment

0 Comments