सिद्दिकी ठोकणार अक्षयवर दावा

 सिद्दिकी ठोकणार अक्षयवर दावा 

वेब टीम मुंबई : युटयूबर रशीद सिद्दिकी याने अक्षय कुमार याने पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोतोसिला प्रत्युत्तर देऊन विरोध दर्शवला असून, "माझ्या व्हिडीओज मध्ये आक्षेपार्ह असे काही नाही." असे म्हंटले असून अक्षय कुमारने दिलेल्या ५०० कोटीच्या अब्रूनुकसानीच्या नोटीसीला उत्तर देऊन,नोटीस मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. 

अक्षयकुमारने १७ नोव्हेंबर रोजी रशीद सिद्दिकीला ५०० कोटीच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस देऊन त्यात,सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी माझ्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप केल्याचे म्हंटले आहे.अक्षयकुमारने आय.सी.लीगल द्वारे पाठवलेल्या नोटीस मध्ये,सिद्दिकी याने त्याच्या एफ.एफ.न्यूज या युट्यूब चॅनेलवर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओज प्रदर्शित केल्याचे म्हंटले आहे.तर,सिद्दिकीने जे.पी.जयस्वाल यांच्या द्वारे दिलेल्या प्रत्युत्तरात खोटे, मनस्ताप देणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आणि मला जाणून बुजून त्रास देण्यासाठी हे आरोप केल्याचे सिद्दीकेचे म्हणणे आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक बड्या असामी अडकल्याने नामवंत माध्यमांनी अचूक माहिती न देता सत्य दडपण्याचा प्रयत्न केला.याउलट मी सत्य प्रदर्शित केले असे सिद्दिकीचे म्हणणे आहे. 

सिद्दिकीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून माझ्या चॅनेलवरील बातम्यांना आक्षेपार्ह न ठरवता तत्कालीन परिस्थितीशी तर्कसंगत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जावे त्यान म्हणले आहे. याच नोटिसीत ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बातम्यांबद्दल इतक्या उशिरा नोटीस पाठविल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

५०० कोटीचा हा दावा हास्यास्पद आणि अवांछित असून हि नोटीस आपल्यावर दबाव आणणारी असल्याचे म्हटले आहे. 

सिद्दिकीने अक्षयकुमारला हि नोटीस मागे घेण्यास सांगितले असून असे न केल्यास अक्षयला रीतसर कारवाईला सामोरे जावे लागेल असे बजावले आहे. 

मुंबई पोलिसांचा अवमान करणारे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी करणारे व्हिडीओज प्रदर्शित केल्याच्या कारणावरून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारनेही सिद्दीकीवर दावा दाखल केला आहे.        


Post a Comment

0 Comments