आर्ट ऑफ लिव्हिंग च्यावतीने ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग च्यावतीने  ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर

   वेब टीम  नगर - आजच्या कोरोनाच्या महामारी मुळे समाजापुढे गंभीर परीस्थितीत निर्माण झाली आहे.या परीस्थितीतुन बाहेर कसे पडायचे पुढे कसे जायचे.आर्थीक परिस्थितीचा सामना कसा करायचा, अशा अनेक प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर पडूण आनंदी उत्साही व शांत जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण गरजेचे आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्यावतीने सोमवारी दि २३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ ते ९ या वेळेत एक निःशुल्क सत्र आयोजीत केले आहे.

     अनिश्‍चिततेच्या सावटाखाली राहून माणूस ताणतणाव, अशांती , दुःख, क्लेश भोगत आहे. आपल्या भावना कोणाजवळ व्यक्त करण्यासाठी संकोच वाटतो. मनातल्या मनात या भावना त्यांना गुदमरून टाकतात आणि मग व्यक्ती व्यसनाकडे वळतो. आत्महत्येचे विचार डोक्यात यायला लागतात.याच कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी  आपल्या मित्र मंडळीना, नातेवाईक सुद्धा tiny.bb/rertart या लिंकवर रजिस्ट्रेशन करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  भुषण मालु (मो.९२२५३२२७९३) यांच्याशी संपर्क साधावा.  

Post a Comment

0 Comments