स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील ३ बालकांचे

स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील ३ बालकांचे

दोन कुटुंबात केले यशस्वी पुनर्वसन


वेब टीम नगर : मागील १ वर्षापासुन स्नेहालयच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रात दत्तकच्या प्रतिक्षेत असणारी ३ बालके भाऊबीजेच्या सुमुहूर्तावर सक्षम कुटुंबात दत्तक देण्यात आली. या वेळी मुंबई येथील लक्षावधी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून  सौ. शुभाताई बेनुरवार त्यांच्या सहकारी वैष्णवी सावंत, रेखा जगताप, मंगल नाईक , बालविकास अधिकारी सर्जेराव शिरसाठ,  बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य  प्रवीण मुत्याल, ॲड.भाग्यश्री जरंडीकर, ॲड. विनायक सांगळे ,आदी उपस्थित होते. सोनकुळे आणि ठाणेकर या कुटुंबांना ही तीन मुले देण्यात आली.

मागील १ वर्षापुर्वी स्नेहांकुर प्रकल्पात दोन बालकांना घेवुन एक माता स्नेहांकुर मध्ये  आली. कौटुंबिक अत्याचार असह्य झाल्याने या महिलेने  घर सोडले. नातेवाईकांनीही कोणीच आधार किंवा लक्ष दिले नाही. अशा महिलांचा समाजातील अपप्रवृत्तींवर फायदा घेतात. त्यातूनच झालेल्या २ मुलांसह जीवन जगताना अनेक संकटे या महिलेवर कोसळली.७ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा ,दोघेही हुशार आणि सुदृढ होते.पण रस्त्यावरील फरफटीत मुलांचीही फरपट होतच होती.स्नेहालय परिवाराने तिला आश्रय  देऊन मुलांसह सांभाळण्याची तयारी दर्शवली .परंतु मुलांच्या भल्यासाठी त्यांनी कुटुंबात घरात राहावे असे तिचे मत होते.

शेवटी तिने आपल्या बालकांना उज्वल भविष्य देण्यासाठी कठोर निर्णय घेतला.तिने तिची दोन्ही मुले कायदेशीररित्या  स्नेहांकुरच्या स्वाधीन केली . मागील एक वर्षापासून या मुलांना उत्तम आई - बाबा मिळावे म्हणुन स्नेहांकुर टिम अहोरात्र झटत होती. सोनकुळे कुटुंबाने या दोन्ही बालकांना स्विकारले. सोनकुळे कुटुंबातील पती हे आयुर्विमा उपक्रमात अधिकारी  आहेत .तर  पत्नी या स्वतः वैद्यकीय डॉक्टर आहेत. ठाणेकर परिवाराचा सोलापूर जिल्ह्यात स्वतःचा व्यवसाय आहे.दोन्ही कुटुंबांनी स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने बाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 स्नेहालयचे संचालक अनिल गावडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments