नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम

 नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम

 वेब टीम नगर - राज्यस्तरीय नगरसेवक परिषदच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच दिले आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांचे हक्क आणि मान-सन्मान, मानधन मिळवून देणे, नगरसेवकांच्या अधिकारात भरीव वाढ करणे अशा विविध विचाराने संघटना काम करणार आहे. लवकरच मुंबई येथे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या समवेत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार असल्याचे अध्यक्ष राम जगदाळे यांनी सांगितले.

     संभाजी कदम  नगरसेवकांना त्यांचे हक्क मिळावे, नगरपालिका व महानगरपालिकेला हक्काचा निधी मिळवा, यासाठीही त्यांनी वेळावेळी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या नगरसेवकांसह संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली होती. यांनी नगरसेवक म्हणून विविध पातळ्यांवर केलेल्या चांगल्या कामांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. आता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरसेवकांचे संघटन करुन त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments