काटवन खंडोबा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

 काटवन खंडोबा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने प्रभागातील प्रश्‍न मार्गी लागत आहेत - अ‍ॅड.अभय आगरकर

  वेब टीम  नगर - गेल्या अनेक वर्षांपासून काटवन खंडोबा रस्त्याच्या काम रखडले होते. परंतु या भागाच्या नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने ते आता मार्गी लागले आहे. या रस्त्या स्टेशनरोड - आयुर्वेद कॉर्नरला जोडलेला असल्याने या रस्त्यावरील वाहतुक बरीच वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते. रस्ता पूर्ण झाल्यावर नागरिकांची मोठी सोय यामुळे होणार आहे. सर्व नगरसेवक प्रभागातील कामांबाबत सक्रिय आहेत. परंतु चांगले काम होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे या रस्त्याच्या कामास उशीर झाला असला तरी आता हे काम मार्गी लागले असल्याने या रस्त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. नागरिकांनीही आपल्या प्रश्‍नांसाठी पाठपुरावा केला पाहिजे, नगरसेवक ते सोडवतीलच, असा विश्‍वास माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी व्यक्त केला.

     प्रभाग क्र.१५ मधील काटवन खंडोबा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, दत्ता जाधव, किसन व्यवहारे, दिनेश दळवी, संतोष जाधव, पुष्पा व्यवहारे, संदिप बोरुडे, बबलू ससे, परेश व्यवहारे, भाऊसाहेब कर्पे, अतुल गायकवाड, ऋषीकेश जाधव, वैजीनाथ लोखंडे, विशाल लोळगे, शिवाजी जाधव, बाबासाहेब डागवाले आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुवर्णा जाधव म्हणाले, प्रभागातील नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी तत्पर आहोत. काटवन खंडोबा रोडच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. परंतु कोरोनामुळे या कामाचा विलंब झाला असला तरी आता हे काम सुरु झाल्याचे मोठे समाधान आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

     याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, आम्ही सर्व नगरसेवक प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी तत्पर आहोत. प्रभागाच्या नियोजनपूर्ण विकास करण्यासाठी विविध भागातील आवश्यक कामांना प्राधान्याने पूर्ण करत आहोत. पुढील काळातही आणखी काम सुरु होतील.  या माध्यमातून आदर्श प्रभाग करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी नगरसेवक दिपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश दळवी यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments