विश्वहिंदू परिषद व बजरंग दल आयोजित किल्ले बनवा स्पर्धा

 विश्वहिंदू परिषद व बजरंग दल आयोजित किल्ले बनवा स्पर्धा                                                           

वेब टीम  नगर-दिवाळीत मुले आवडीने किल्ले बनवितात यामुळे इतिहासाची माहिती होते.मुलांना इतिहासाची व किल्ल्यांची माहिती व्हावी.मुलांनी किल्ले बनवावेत.व मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून नगर जिल्हा विश्वहिंदू परिषद व बजरंग दलातर्फे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.किल्ले बनवा हि स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे.(छोटागट ५ वर्ष ते ११ वर्ष)व(मोठागट १२ वर्ष ते १७ वर्ष) असा आहे.माती,पर्यावरनपूरक वस्तुंनी किल्ला बनवावा. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सह्भागाबद्दल ई-प्रमाणपत्र मिळेल.किल्ला व किल्ल्यासोबत सेल्फी फोटो असे दोन फोटो,स्पर्धकांचे नाव व पत्ता, मोबाईल नंबर दि.२० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पाठवावेत.परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.संपर्क व अधिक माहितीसाठी बजरंगदल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे -७३८७७७७३८३,९८५०१९९९९७ या व्हाट्सअप नम्बरवर पाठवावेत.  


                                                                                                                                         

Post a Comment

0 Comments