महात्मा गांधी उर्दू शाळेत इंदिरा गांधी जयंती साजरी

 महात्मा गांधी उर्दू शाळेत इंदिरा गांधी जयंती साजरी

     वेब टीम भिंगार - अहमदनगर छावणी परिषद येथील महात्मा गांधी उर्दू स्कूल मध्ये स्व. इंदिराजी  गांधी जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पै. सलीम सय्यद, जिल्हा न्यायालय विधी सदस्य  रिजवान शेख, अ‍ॅड. दावर शेख, इस्माईल बेग, किसन तागडकर, अन्सार सय्यद, मुख्याध्यापक श्री. खान खैरमोहमद सर अदि मान्यवर उपस्थित होते.        

                                                                                                   याप्रसंगी खैर मोहंमद खान म्हणाले, जगातील सर्वात सामर्थ्यशाली आणि महत्वपूर्ण नेत्यांमध्ये स्व.इंदिरा गांधी यांची  गणना करण्यात येते. त्यांच्या दूरदृष्टीने देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे अनेक धाडसी निर्णय घेऊन देशावासीयांच्या हिताचा योजना राबविल्या. त्यामुळे देशात आधुनिक क्रांती होऊन जगात भारताचा दबदबा निर्माण झाला. सर्वसामान्यांच्या नेत्या म्हणून त्यांची लोकप्रियता सर्वदूर पोहचली होती. आधुनिक भारताच्या जननी म्हणून त्यांचा लौकीक आजही आपणास मार्गदर्शक आहे, असे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सार सय्यद यांनी केले तर इस्माईल बेग यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments