आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

बनाना बन्स 

साहित्य : १ वाटी मैदा ,१ वाटी पिकलेली केळी , जिरेपूड,मीठ,साखर , किंचित खायचा सोडा ,१ चमचा दही. 

कृती : प्रथम केली कुसकरून घेणे. त्यामध्ये मीठ,साखर , जिरेपूड , खायचा सोडा,१ चमचा दही,घालून चांगले फेटून घेणे. हवे तर हॅण्ड मिक्सरने एकजीव करून घेणे. त्यामध्ये बसेल तेवढा मैदा घालून पीठ मळून घेणे. हे पीठ ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवणे. पुरी सारखे लाटून तळून घेणे. 

ह्या पुऱ्या गारही चांगल्या लागतात. प्रवासात देखील उपयुक्त आहेत.      

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak

Post a Comment

0 Comments