वंचित घटकातील मुलांसमवेत लायन्सचा दीपोत्सव साजरा

 वंचित घटकातील मुलांसमवेत लायन्सचा दीपोत्सव साजरा

दीपोत्सवाचे अकरावे वर्ष :  कार्यक्रमाचा आनंद लुटत विद्यार्थ्यांची धमाल

वेब टीम नगर : रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांचा प्रकाश तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था व शासकीय बाल निरिक्षण समितीचे दीपोत्सव-२०२० चे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम पाळून विविध संस्थेतील मुलांना एकत्र न करता स्नेहालयासह, अनामप्रेम, राहुरी येथील मुलींचे वसतिगृह, मनसेवा प्रकल्प, स्नेहांकुर, बालभवन, बाल निरीक्षणगृह अशा आठ संस्थेस भेट देऊन एकाच दिवशी सातशेपेक्षा जास्त वंचित घटकातील मुलांसह दिवाळी साजरी करण्यात आली.

या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्सचे उपप्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.एस. दीपक, शरद मुनोत, मोहनशेठ मानधना, अ‍ॅड. जयवंत भापकर, अ‍ॅड. ममता नंदनवार, लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार सुधीर लांडगे, प्रकल्प प्रमुख किरण भंडारी, आनंद बोरा, डॉ. सिमरन वधवा, डॉ.मीरा बडवे, धनंजय भंडारे, हरजितसिंह वधवा, निरंजन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, किरण दीपक, ज्योती दिपक, सतीश बजाज, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, स्नेहालयाचे अनिल गावडे, उद्योजक सतीश राजहंस, मुकुल धूत आदींसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे व प्रशांत मुनोत यांनी केले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी मागील अकरा वर्षापासून वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा हा उपक्रम राबविण्यात येतो. वंचित घटकांसाठी वर्षातून एकदा हा कार्यक्रम आनंदाची पर्वणी ठरत असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे या मागचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.एस.एस. दीपक यांनी जीवनात हिरा बनून चमका गुणवत्तेच्या तेजाने यश नक्की मिळेल. तर विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केल्यास ध्येय प्राप्ती होणार असल्याचा सल्ला त्यांनी दिला. अ‍ॅड. ममताजी नंदनवार यांनी आत्मविश्‍वास, ईच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रीयाशिलता व महत्त्वकांक्षा हे गुण आत्मसात करुन जीवनात यशस्वी होण्याचे सांगितले.

लायन्सचे उपप्रांतपाल हेमंत नाईक म्हणाले की, फक्त पैश्याची श्रीमंती असून उपयोग नाही. श्रीमती ही दातृत्वाची असावी लागते. अकरा वर्ष वंचित घटकांसमवेत दिवाळी साजरी करुन शहरात सामाजिक बांधिलकी जोपासली जात असल्याचा आनंद होत आहे. यशासाठी पात्रता अंगीकारल्यास यश आपोआप मागे येते. ज्या गोष्टीची आवड आहे. त्या गोष्टीचा सातत्याने सराव त्यामध्ये सर्वश्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करा. ध्येय स्पष्ट असल्यास ध्येयप्राप्ती करता येत असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना ध्येय निश्‍चित करण्याचे त्यांनी आवाहन केले.

. यावेळी धनंजय भंडारे, किरण भंडारी, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी, कमलेश भंडारी, सतीश बजाज, मुकुंद धूत, डॉ. प्रिया मुनोत, भावना लांडगे आदींसह लायन्स, निरंजन सेवाभावी संस्था, चाईल्ड लाईन व स्नेहालयाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल बागुल यांनी केले. आभार सुधीर लांडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद पारगावकर, जस्मितसिंह वधवा, सहजकोर वधवा, राजबीरसिंग संधू, सुमित लोढा, मनीषा सोमानी, संदेश कटारिया, विपुल शाह, सुनील छाजेड, डॉ. संजय असणानी, सुमित लोढा, डॉ. हेमंत नाईक, पियुष खंडेलवाल आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments