सदृढ शरीर हीच खरी धनसंपदा

सदृढ शरीर हीच खरी धनसंपदा 

पै. नाना डोंगरे : पाडव्याला निमगाव वाघात  व्यायामाच्या साहित्याची पूजा


वेब टीम नगर : दिवाळी पाडव्याला निमगाव वाघा येथे कुस्ती व ज्युदो खेळाच्या मॅट व व्यायामाच्या साहित्याची पूजा करण्यात आली. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू तथा महिला कुस्ती मल्ल विद्येच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा डोंगरे, पै. विकास निकम, पै. संदिप डोंगरे, नितेश डोंगरे आदी उपस्थित होते.

नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू तथा महिला कुस्ती मल्ल विद्येच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा डोंगरे व एनआयएस प्रशिक्षिका प्रियंका डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील खेळाडू घडविण्यासाठी निमगाव वाघा येथे मुला-मुलींना मोफत कुस्ती व ज्युदो खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे थांबलेल्या कुस्ती व ज्युदो सरावाचे पुन्हा पाडव्याच्या मुहुर्तावर श्रीगणेशा करण्यात आला.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, सदृढ शरीर हीच खरी धनसंपदा असून, कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना आरोग्य व व्यायामाचे महत्त्व पटले आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना कुस्ती व ज्युदोचे धडे देता यावे, यासाठी गावात मोफत प्रशिक्षण दिले जाते. अनेक उत्तम खेळाडू पुढे येत असून, मुलांनी देखील आवड असलेल्या खेळात करिअर करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रतिभा डोंगरे यांनी सध्या मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असून, मुलींना स्वसंरक्षणासाठी कुस्ती व ज्युदो सारख्या खेळ आत्मसात केले पाहिजे. मुली या देखील आपले संरक्षण स्वत: करु शकतात. तर संकटाच्या वेळप्रसंगी इतरांनाही त्या मदत देऊ शकतात. व्यायाम मुलांप्रमाणे मुलींना देखील महत्त्वाचा असून, ग्रामीण भागातील मुलींनी व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments