पदवीधर शिक्षकांमधून अभावितपणे केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात यावी

 पदवीधर शिक्षकांमधून अभावितपणे केंद्रप्रमुख 

पदोन्नती करण्यात यावी

महेश डोईफोडे : पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी यांना निवेदन

वेब टीम नगर : जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक केंद्राचा पदभार कार्यरत केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आला आहे. त्यासंदर्भात पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांना निवेदन दिले. व सदर प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाचे मेहताब लदाफ हे उपस्थित होते.

दि.३० जून २०२० पर्यंत बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, विज्ञान विषयाच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणी देण्यात याव्या, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला देण्यात यावे, डीसीपीएस अंतर्गत कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा हिशोब शिक्षकांना मिळावा, सलगसेवा सारखी असणार्‍या पदवीधर शिक्षकांचे उपाध्यापकापेक्षा वेतन कमी आहे ही तफावत दूर करण्यात यावी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना शासन आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात यावे आदी शिक्षकांच्या मागण्या महेश डोईफोडे यांनी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांच्याकडे मांडल्या. चर्चेदरम्यान संबंधित कर्मचार्‍यांना प्रश्‍नासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी दिल्या. अभावितपणे केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शासनाकडे परवानगी मागितली असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी दिली.


केंद्रप्रमुख यांची पदे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे पदवीधर शिक्षकातून अभावितपणे केंद्र प्रमुखाची पदे भरावीत अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शासनस्तरावर देखील पाठपुरावा करणार. 

 -महेश डोईफोडे (पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ राज्य सरचिटणीस)


Post a Comment

2 Comments

  1. शासन स्तरावरील धोरणात्मक प्रश्न आहे त्यामुळे उपशिक्षणाधिकारी सोबत चर्चा करून पदवीधर अभावीत पणे भरती प्रक्रिया कशी होणार तरी प्रश्न महत्वाचा आहे

    ReplyDelete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)