पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे खुली

पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे खुली 

राज्य सरकारची जनतेला दिवाळीभेट 


वेब टीम मुंबई- दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्या
परवानगी देऊन राज्यातील जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं आहे.

दिवाळी-पाडव्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी देण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत माहिती दिली.मंदिरात जातांना चपला बाहेर काढणं जितकं अंगवळणी पडलं आहे तितकच तोंडाला मास्क लावणं आवश्यक आहे. या शिवाय सोशल डिस्टंसिंगच पालन करावे लागणार आहे. 

राज्यातील जनतेने राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. धार्मिक स्थळं खुली केल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल सुरु होईल. या माध्यमातून अर्थकारणालाही चालना मिळेल.गेल्या आठ महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद होती. त्याचा मोठा परिणाम अर्थकारणावरही झाला होता. मात्र आता हि कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.   

Post a Comment

0 Comments