पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभासदांची दिवाळी गोड

पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम

खात्याच्या सभासदांची दिवाळी गोड

 सभासदांच्या खात्यावर लाभांश जमा


वेब टीम नगर - कोरोना महामारीच्या संकटामुळे कलम १४४ लागू झाल्याने पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सभा घेता येत नसल्याने सभासदांचा लाभांश जमा करण्यास अडचण निर्माण झाली होती. दि.२ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने अनलॉकचे धोरण स्विकारुन सुधारित अध्यादेश काढल्याने लाभांश वाटपाचा मार्ग मोकळा केला. याच अध्यादेशाला अनुसरून पाटबंधारे संस्थेच्या संचालक मंडळाने तातडीने दि.१० ऑक्टोबर रोजी लाभांश मिळणेबाबत विषयाची मीटिंग घेऊन ठराव संमत केला. तसेच नफा वाटणीचा प्रस्ताव तयार करुन माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडे पाठवून त्यांना विनंती करून त्यांची शिफारस घेऊन ११ ऑक्टोबर नाशिक येथे दिवसभर थांबून मंजुरी प्राप्त केली. सभासदांना दिवाळी पूर्वीच लाभांश त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा संचालक मंडळाचा मानस अखेर पूर्णत्वाला गेला असून, सभासदांची दिवाळी गोड होणार आहे.

संस्थेच्या इतिहासात मीटिंग घेऊन त्याच दिवशी प्रस्ताव तयार करून त्याच दिवशी नगर येथून मंजुरी घेऊन दुसर्‍या दिवशी नाशिक येथून मंजुरी प्राप्त करून बँकेची परवानगी घेऊन सभासदांच्या याद्या तयार करून लगेच दुसर्‍या दिवशी लाभांश जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिवाळीपुर्वी लाभांश जमा झाल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सभासदांच्या भाग भांडवलावर ९% टक्के दराने लाभांश जमा करण्यात आला आहे. लाभांश मिळणेबाबत अनेक दिवसांपासून सभासदांची मागणी होत होती. संस्थेच्या सन २०१९ -२० या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा ८ कोटी ५५ लाख तर निव्वळ नफा ९३ लाख झाला आहे. संस्थेचे स्वतःचे भाग भांडवल ९ कोटी ५६ लाख असून संचित ठेवी ३५ कोटी ३५ लाख आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल २४५ कोटी आहे. तर कर्ज वाटप ८० कोटी ६२ लाख आहे.सभासद संख्या २३०२ असून, कॅश क्रेडिट २० कोटी पैकी ५ लाख उचल आहे. सहकारी बँकेत शेअर्स २.५० कोटी आहेत. तर रिझर्व फंडात १४ कोटी ५५ लाख रुपये जमा आहेत. 

संस्थेत काम करताना संचालक मंडळाने सभासदांची आर्थिक जपवणूक व संस्थेच्या हिताचे काम केले असून, अत्यंत पारदर्शी कारभार केलेला असल्याचे अध्यक्ष शांताराम आवारी व उपाध्यक्ष दीपक वाळके यांनी सांगितले. संस्थेच्या कारभारात माजी अध्यक्ष व संचालक नारायणराव तमनर, अजय लखापती, शहाराम चेमटे, उमेश डावखर, नवनाथ घोंगडे, यादव उदागे, शिवाजीराव तोरणे, चंद्रकांत पडोळे, ललित पवार, अभिमन्यू घोलवड, नामदेव बोरुडे, राधाकिसन आभाळे, प्रियांका मिसाळ, तज्ञ संचालक भाऊसाहेब शेळके, दत्तात्रय वाघुले, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर हळगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर शिंदे इतर सर्व कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले आहे.


Post a Comment

0 Comments