गोशाळेत अवतरले नंदनवन.....

गोशाळेत अवतरले नंदनवन..... 

निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत वसू बारस उत्साहात                  

वेब टीम नगर-दिवाळीची सुरुवात वासू बारस ने केली जाते.हिंदुधर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे.भगवान श्री कृष्णाने गाईचे पूजन केले आहे.त्याकाळापासूनच गोधनाचे पूजन वसू बारसनिमित्त सर्वत्र केले जाते.वसू बारसेनिमित्त निसर्गसृष्टी गो शाळेत सकाळपासूनच गो पूजनासाठी भाविक येत होते.या गोशाळेत जणू नंदनवनच अवतरले आहे असे वाटले.


     

   इसळक येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत वसू बारस उत्साहात साजरी करण्यात आली.वसू बारस निमित्त महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.याप्रसंगी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा,भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे,मधुसूदन मूळे,मुकुल गंधे,नगरसेविका सोनालीताई चितळे,अजय चितळे,माजी महापौर अभिषेक कळमकर,बाळासाहेब बोराटे,भैया परदेशी,मयूर बोचूघोळ,इसळकचे माजी सरपंच संजय गेरंगे,एल अँड टी चे संदीप महाजन,उद्योजक सुहास फुंदे,प्रफुल्ल नातू,मारुतराव लेकुरवाळे,अरविंदराव धिरडे,अतुल वामन,उमेश भांबरकर,निलेश चिपाडे,राहुल कांडेकर,विनायक सर्जे,डॉ.राजा ठाकूर,राजुशेठ बजाज,पमासेठ तलरेजा,राहुल ढवळे, प्रवीण खंडेलवाल,सागर कुलकर्णी,डॉ.अर्चना सकट,डॉ.अर्जुन घुले,डॉ.गंगाराम निमसे,गोशाळेचे अध्यक्ष डॉ.विलास जाधव,खजिनदार गजेंद्र सोनवणे,सचिव गौतम कराळे,बाली जोशी,मुकेश साठ्ये,विश्वास बेरड,सुरेंद्र सोनवणे, विष्णुपंत कुलकर्णी,गणेश घोडेकर,नरेंद्र सोनवणे,गणेश कराळे,किरण हवालदार,संदीप मोरे,पोपट आठरे,दीपक फुलडहाळे ,सौ.वर्षा कराळे,सौ.कळमकर,सौ.नीलम कुलकर्णी,सौ.मनीषा सर्जे आदी उपस्थित होते.       


                            

 माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते सपत्नीक गो पूजन करण्यात आले.याप्रसंगी कळमकर म्हणाले कि,गोसेवा हि ईश्वर सेवा आहे.निसर्ग सृष्टी गोशाळेत देशी गायीचे पालन सेवाभावी पद्धतीने करण्यात येते.येथे अपघातग्रस्त गायीचे देखील संगोपन केले जाते हि कौतुकास्पद बाब आहे.

Post a Comment

0 Comments