हिंमत जाधव खून प्रकरणी सात आरोपीना जन्मठेप

  हिंमत जाधव  खून प्रकरणी

सात आरोपीना  जन्मठेप

१ लाख १९ हजाराचा दंड 

वेब टीम नगर - हिम्मत जाधव खून प्रकरणात न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख २० हजार रु. दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश एम.व्ही देशपांडे  यांनी ठोठावला आहे.

१३ सप्टेंबर २०१६ रोजी हिम्मत जाधव हा त्याच्या मित्र संतोष चव्हाण त्याच्याबरोबर जिल्हा सत्र न्यायालयात दुचाकीवरन आला होता. न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर औरंगाबाद रस्त्याने घरी जात असताना इमामपूर घाटाजवळ मागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या त्यामुळे जाधव खाली पडला व मोटरसायकल घसरली. हि माहिती त्याच्या घरच्यांना व पोलिसांना मिळाल्यामुळे हिम्मतचे वडील व भाऊ , पोलीस घटना स्थळी पोहोचले हिम्मत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. संतोष चव्हाण याने एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात ३ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरवातीस गुन्ह्याचा तपास स.पो.नि राहुल पवार यांनी केला. पुढील तपास स.पो.अधीक्षक आनंदा भोईटे यांनी केला. त्यांची बदली झाल्याने त्यानंतरचा तपास स.पो.अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर मनीष कलवानिया यांनी दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश एस.आर जगताप यांच्या समोर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील केदार केसकर यांनी एकूण २५ साक्षीदार तपासले. फेब्रुवारी महिन्यात न्या.जगताप यांनी रत्नागिरीला बदली झाल्याने पुढील कामकाज न्या.एम.व्ही देशपांडे मॅडम यांच्या समोर करण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आरोपी राजू शेटे याने शत्रुत्वा पोटी आरोपी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे , अजिनाथ ठोंबरे, यांना हिम्मतला मारण्याची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी आरोपी संदीप थोपटे, राहुल दारकुंडे यांनी मयताचे लोकेशन गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना दिले. तसेच आरोपी जावेद शेख याने गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका इतर आरोपींना पुरवल्याची बाब सिद्ध झाली. या खटल्यात प्रत्येक्षदर्शी  संतोष चव्हाण, मयताचे वडील अभिमन्यू , बहीण दीपाली  , फोटोग्राफर दादा शिर्के , सी.सी टीव्ही तज्ञ ब्रजेश गुजराथी, शवविच्छेदन करणारे औरंगाबाद येथील डॉ.विकास राठोड, मुंबई येथील बॅलेस्टिक एक्स्पर्ट डॉ. मुलानी , सी.सीटीव्ही व फोटो तज्ञ वर्ष भावे , तपासी अधिकारी राहुल पावर , आनंदा भोईटे , मनीष कलवानिया व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाच्या समोर आलेला साक्षी पुरावा , कागदोपत्री पुरावा , सहाय्यक सरकारी वकील केदार केसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून सर्व आरोपींना आजन्म कारावास आणि १ लाख १९ हजार दंडाची शिक्षा दिली. सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.कॉ बी.बी बांदल , पो.हे.कॉ दीपक गांगर्डे यांनी सहाय्यक सरकारी वकील केदार केसकर यांना साहाय्य केले. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सरकारी वकील केसकर यांना मदत केली.   

Post a Comment

0 Comments