पूनम पांडे नंतर मिलिंद सोमणवरही अश्लीलतेचा गुन्हा दाखल

पूनम पांडे नंतर मिलिंद सोमणवरही 

अश्लीलतेचा गुन्हा  दाखल 

गोव्याच्या बीचवर नग्नावस्तेत धावला मिलिंद 

वेब टीम गोवा: गेल्या पंधरवड्यात पूनम पांडेवर गोव्याच्या बीच वर नग्न चित्रफीत चित्रित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी परवाच मिलिंद सोमणवर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्नावस्थेत धावल्याने पोलिसांनी अश्लीलतेचा गुन्हा दाखल केला आहे. 


दिनांक ४ रोजी मिलिंदच्या ५५वा वाढदिवस होता तो वाढदिवस सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी मिलिंद सोमणनी हा खटाटोप केल्याचे सांगितले जाते. स्वतः नग्नावस्थेत समुद्रकिनारी धावून त्याची छायाचित्रे इनस्टाग्रामवर प्रसिद्ध केल्याचा आरोप मिलिंद वर ठेवण्यात आला आहे. मिलिंदच्या अगोदर पूनम पांडेने समुद्र किनाऱ्यावर स्वतःची नग्न चित्रफीत चित्रित केली, त्यापाठोपाठ मिलिंद सोमणनेही आपली छायाचित्र इंस्टाग्रामवर टाकल्याने वादंग निर्माण झाला.  

Post a Comment

0 Comments