तहसील कार्यालयात जागरण गोंधळ

 तहसील कार्यालयात  जागरण गोंधळ

शेतकर्‍यांसाठी भाजपा आक्रमक

वेब टीम नगर - नगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकर्‍यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजप नगर तालुक्याच्या वतीने नगर तहसील कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश पदाधिकारी युवराज पोटे, रमेश पिंपळे, दिपक कार्ले, अर्चना चौधरी, नंदा चाबुकस्वार, मोहन गहिले, बापूसाहेब बेरड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, राजू दारकुंडे, प्रशांत गहिले,  गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, नानासाहेब बोरकर, उमेश डोंगरे, शामराव घोलप, सुभाष निमसे, पोपट शेळके, कांबळे सर, देविदास आव्हाड, बबन शिंदे, गणेश भालसिंग, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, राहुल शिंदे, पोपट साठे, संदीप म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत कांबळे, शुभम शेळके, विजय गाडे, सचिन बोरुडे, राहुल गुंड, दत्ता वाडेकर आदी सहभागी झाले होते.

 


या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी राज्य सरकारवर कडकडून टीका करत राज्य सरकार हे अत्यंत निष्क्रिय स्वरूपाचे सरकार असून या सरकारला शेतकर्‍यांचे घेणे-देणे नसून यांना फक्त प्रशासनातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यातच आनंद आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार व प्रशासन अतिवृष्टी, कर्जमाफी, दूध दरवाढ याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. नगर तालुक्यातील फक्त दोन महसूल मंडलातीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून बाकी मंडलात पंचनाने करण्याचे आदेश दिलेले नाहीत हे तालुक्याचे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकर्‍यांना पंचनामे न करता आर्थिक मदत करावी, दुध दरवाढ करावी, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर करून शेतकर्‍यांना ताबडतोब मदत मिळवून द्यावी अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments