आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

 कोरिएण्डर राईस 

साहित्य : २ वाटी बासमती तांदूळ , २ वाटी कोथिंबीर बारीक चरलेली , २  बटाटे उकडलेले , आलं - लसूण  हिरवी मिरची पेस्ट , दही , मिरे ,लवंग ,दालचिनी तमालपत्र , काजू . 

कृती : प्रथम तांदूळ धुवून फडफडीत शिजवून घ्यावे व चाळणीत गार करण्यास ठेवावेत. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून चिरून ठेवावेत. कढईत तुपाची फोडणी करून त्यामध्ये तमालपत्र , मिरी , लवंग , दालचिनी घालावे. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि २ वाटी कोथिंबीरीची पेस्ट टाकून १ वाफ काढावी.या मसाल्यामध्ये शिजवलेला भात, मीठ, साखर टाकून एक वाफ काढावी सर्वात शेवटी एक वाटी दही टाकून हलवून पुन्हा एक वाफ काढावी. 

तयार पोटॅटो राईस बाउल मध्ये  कडून त्यावर तळलेले काजू टाकून रायत्या सोबत  सर्व्ह करावे.  

Post a Comment

0 Comments