अर्णबचा तुरुंग मुक्काम वाढला

अर्णबचा तुरुंग मुक्काम वाढला 

सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले 

वेब टीम नवी मुंबई –  रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीयांना ७ नोव्हेंबर रोजी राहत्या घरातून अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत करण्यात आली होती.  त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना  तुरुंगातच राहावं लागणार आहे.  

अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. 

त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या मुळे आता अर्णव गोस्वामी यांना सध्या तरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.  



Post a Comment

0 Comments