भ्रमंती

 भ्रमंती 

पृथ्वीवरील आठवे नंदनवन "बेहस्त बाग"

किल्ल्याची इमारत पूर्ण झाल्यानंतर या शहरातील बेहस्त बागही दुसरी राजप्रासादिक इमारत आहे.असं म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही.

आज विदीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतीकडे पाहिल्यानंतर कधीकाळी येथे जगातील अद्वितीय राजप्रासाद होतोय या कल्पनेवर कोणाचाही विश्वास बसणार नाही निजामशाहीचा संस्थापक अहमदशहा याने त्याला स्वतंत्ररीत्या राहण्यासाठी म्हणून १५०६ साली या प्रसादची निर्मिती केली. 

बेहस्त बागेची रचना हीदेखील भोवती पाण्याचा मोठा तलाव व त्यामध्ये उभी असलेली अष्टकोणी इमारत आणि सभोवार निरनिराळ्या फुलांचे बगीचे अशी असल्यानेच बहुधा या प्रसादाला बे हस्त बाग म्हणजे आठवे नंदनवन म्हटले जायचे.

बेहस्त बाग या दोन मजली अष्टकोनी इमारतीसाठी वडगाव गुप्ता आणि  शेंडी होऊन पाण्याची व्यवस्था केली होती बुर्‍हाण निजामशहाचा विवाहही याच प्रसादात झाल्याची नोंदही इतिहास सापडते त्याकाळी या इमारतीचे सौंदर्य विलोभनीय असे होते बुर्‍हाण निजामशहाला व त्याच्या पत्नीला या राजप्रासादात होडीतून जावे लागले असे वर्णनही त्यात आहे.

सन १५९५ साली अकबराचा मुलगा मुराद याने नगर वर स्वारी केली त्यावेळी त्याचा मुक्काम याच तळ्याच्या इमारतीत होता असा उल्लेख इतिहासात सापडतो.  इंग्रजी राजवटीत बेहस्त बागेची सर्व मालमत्ता कर शेटजी अँड सन्स नगरवाला यांच्याकडे आली त्यांच्याकडून ती रावबहाद्दूर चितळे यांनी खरेदी केल्याने ही मालमत्ता आजही त्यांच्या कुटुंबाकडे आहे. 

नगरच्या उत्तरेकडे बेहेस्त बाग ही इमारत शहरापासून अवघ्या सहा किमीच्या अंतरावर असून सायकलवर ही येथे रपेट करता येते मात्र आता या इमारतीची इतकी दुरावस्था झाली आहे की तिथे कुठल्याही सुविधा सोई उपलब्ध नाहीत.


Post a Comment

0 Comments