गौरी गडाख यांच्या पार्थिवावर
सोनईत अंत्यसंस्कार
गळफास घेऊन आत्महत्या, मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात
वेब टीम नगर - महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भावजय व जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा प्रशांत गडाख यांच्या पत्नी स्व.गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनई येथे आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहाचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.नगर येथील रुग्णालयात इन कॅमेरा पोस्टमॉर्टेमची सोय नसल्याने घाटी रुग्णालयात हे पोस्टमॉर्टेम करण्यात आले.
गौरी यांच्या मागे त्यांचे पती प्रशांत गडाख, २ मुली , असा परिवार आहे. दरम्यानच्या काळात प्रशांत गडाखहे पुणे येतील एका रुग्णालयात दाखल असल्याचे समजते.गौरी या लोणीयेथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत्या.आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नात्यातील हे कुटुंब असून काळ माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोस्टमॉर्टेम नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार होते. मात्र प्रथम दर्शनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निश्पन्न झाले आहे.
0 Comments