रॉयल एनफिल्डची मेट्युअर 350 निश्‍चितच तरुणाईच्या पसंतीस उतरेल - अभिषेक कळमकर

रॉयल एनफिल्डची मेट्युअर 350 निश्‍चितच तरुणाईच्या पसंतीस उतरेल - अभिषेक कळमकर

  वेब टीम नगर - रॉयल एनफिल्ड ही कंपनी दुचाकीच्या निर्मितीच्या क्षेत्रातील भारतीय बनावटीची कंपनी असून, चेन्नई येथे ११२ वर्षापूर्वी या कंपनीने दुचाकी बनविण्यास सुरुवात केली. जगात दुचाकीच्या निर्मितीत व गुणवत्तेत एक नंबरची ही कंपनी असून, या कंपनीने बनविलेली मेट्युअर ३५० सी.सी. ही दुचाकी निश्‍चितच ग्राहकांच्या व तरुणाईच्या पसंतीस उतरेल, असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.

     नगर-मनमाड रस्त्यावरील कराचीवाला ऑटोमोबाईल्स येथे प्रथमच नगरमध्ये आलेल्या मेट्युअर ३५० सी.सी. या दुचाकीचे अनावरण व विक्रीचा शुभारंभ अभिषेक कळमकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शो-रुमचे संचालक प्रभूशेठ कराचीवाला, निखिल  व विशाल कराचीवाला, मॅनेजर संकेत वाघमोडे, अभय कांकरिया, भैय्या परदेशी आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पहिले ग्राहक रविंद्र सुपेकर, निखिल सुपेकर यांना दुचाकीची प्रतिकात्मक चावी देण्यात आली.

     कराचीवाला बंधूंनी यावेळी बोलतांना सांगितले की, रॉयल एनफिल्ड ही कंपनी बदलत्या काळानुसार ग्राहकांची आवड ओळखून, गुणवत्ता सांभाळून अत्याधुनिक नवनवीन गरजेनुसार बदल करते. यामध्ये ग्राहकांच्या सोयी-सुविधांचा व समाधानाचाही विचार केला जातो. कंपनीने बनविलेली ही दुचाकी तरुणाईच्या निश्‍चित पसंतीस उतरलेली आहे. कारण या दुचाकीची बैठक व्यवस्था अमेरिकन स्टाईल क्रुझर पद्धतीची असून या दुचाकीला अतिशय सुंदर लुक कंपनीने दिला आहे. ही दुचाकी ड्युअलसिट असून ग्राहकांना सात रंगात उपलब्ध होईल. याचे शॉकऑपझर उत्तम गुणवत्तेचे असल्याने वाहकाला धक्के बसणार नाहीत. या दुचाकीचे अजून वैशिष्ट्ये असे की मॅकव्हील, दिशामापन यंत्र, मोबाईल चार्जर, विंड स्क्रीन, ड्युअल टोन कलर, क्रोम इंडिकेटर, ब्ल्यु टूथचे कनेक्शन, गुगल मॅप, व्हेईकल ट्रेसर, ट्युबलेस टायर अशा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व सुविधा या दुचाकीमध्ये कंपनीने कार्यान्वित केलेल्या आहेत. दिपावलीच्या पार्श्‍वभुमीवर सध्या या गाडीची नोंदणी कराचीवाला ऑटोमोबाईल्स् येथे सुरु असून, आपण ही सिटी बाईक येथे पाहू शकाल. या दुचाकीची राईडही अनुभव घेऊ शकला, यासाठी कराचीवाला ऑटोमोबाईल्स् या शो-रुमला आवश्य भेट द्यावी, असे आवाहन आहे.


    


Post a Comment

0 Comments